beating esakal
मुंबई

Dombivali Crime : बांधकाम साहित्य पूरवठादाराची ठेकेदारास बेदम मारहाण; पूरवठादारासह 10 जणांवर गुन्हा दाखल

टिटवाळा येथील म्हसकळ गावात मंगळवारी मारहाणीची घटना घडली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - बांधकाम साहित्य पुरविणे, त्याचा आर्थिक व्यवहार यावरून वाद झाल्याने पुरवठादार व त्याच्या साथीदारांनी ठेकेदार व कामगार यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याची घटना टिटवाळा परिसरात घडली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात पुरवठादार संदीप तरे व त्याचे 10 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिटवाळा येथील म्हसकळ गावात मंगळवारी ही मारहाणीची घटना घडली आहे. येथे कलश दर्शन गृह प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या गृह प्रकल्पासाठी बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम करण्यासाठी येथील ठेकेदाराने स्थानिक रहिवासी म्हणून संदीप तरे यांना बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम दिले आहे. तरे हे शिवसेना शिंदे गटाचे टिटवाळा उपविभाग प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे.

बांधकाम साहित्य पुरवण्यातील आर्थिक व्यवहारातून तरे आणि विकासकाचा ठेकेदार यांच्यात धुसफूस सुरू होती. ही धुसफूस वाढल्याने मंगळवारी पुरवठादार संदीप तरे आणि त्यांच्या 10 समर्थकांनी म्हसकळ येथील कलश दर्शन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील ठेकेदार आणि कामगारांना हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठेकेदारासह कामगार गंभीर जखमी झाले. या मारहाणीनंतर हल्लेखोर तेथून पळून गेले.

या प्रकल्पावरील ठेकेदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संदीप तरे यांच्यासह 10 जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पथक शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT