Beating sakal
मुंबई

Dombivali Crime : पार्सलच्या पैशावरुन ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा

डोंबिवली मधील लोढा हेवन परिसरात पार्सलच्या पैशावरून डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली मधील लोढा हेवन परिसरात पार्सलच्या पैशावरून डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली - डोंबिवली मधील लोढा हेवन परिसरात पार्सलच्या पैशावरून डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्य आला आहे. दोन्ही गटाला पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावत दोघांवर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

डोंबिवली लोढा हेवन परिसरात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुनील मिश्रा नामक व्यक्तीने एका कंपनीकडून फूड पार्सल मागवले होते. 1 हजार रुपयाचे पनीर आणि इतर खाण्याच्या वस्तू या पार्सलमध्ये मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ब्लिनकीत डिलिव्हरी बॉय सुनील मिश्रा हा पार्सल घेऊन त्यांच्या इमारतीत पोहोचला. मात्र इमारतीत पोहोचल्यानंतर पार्सलचे पैसे देण्यास मिश्रा तयार नव्हता. पैसे देण्याघेण्यावरून सुनील मिश्रा आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद सुरू झाला.

यादरम्यान डिलिव्हरी बॉयने आपल्या मालकाला सांगून दुकानाचा स्टाफ आणि इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर दुकान कर्मचारी आणि इतर डिलिव्हरी बॉय यांचा ग्राहक यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटात फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाली. ही फ्री स्टाईल हाणामारी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात एका सोसायटीत ही घटना घडली. ही फ्री स्टाईल हाणामारी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT