Crime Sakal
मुंबई

Dombivali Crime : इन्स्टाग्राम वरील मैत्रीने केला घात; अल्पवयीन मुलीवर चार जणांचा अत्याचार

कल्याण मधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शर्मिला वाळुंज

कल्याण मधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

डोंबिवली - कल्याण मधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. इन्स्टाग्राम वर एका तरुणासोबत मुलीची ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांनी मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केला आहे.

कल्याण मध्ये राहणारी पंधरा वर्षीय पीडित हरवली असल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता 22 एप्रिलला सकाळी ती कल्याण रेल्वे स्थानक येथे पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी केली असता तिची आरोपी मधील एका तरुणाची मुलीसोबत ओळख झाली होती. मैत्री झालेल्या तरुणानी माझे प्रेयसी सोबत भांडण झाले आहे.

ती माझ्यावर संशय घेत असून तू माझ्यासोबत ये व माझ्या प्रेयसीला आपले अस काहीच नाही हे सांग असे सांगून तिला भेटण्यास बोलवुन घेतले. त्याच्यावर विश्वास ठेवत मुलगी उल्हासनगर येथे गेली. यावेळी त्याने तिला मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही एका मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने त्याच्या 3 मित्रांना देखील तेथे बोलावून घेतले त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला.

मुलीच्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले असून यात एक अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी तीन आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ट पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup: इटली सलग तिसऱ्यांदा स्पर्धेतून बाहेर; 48 संघ खेळणार मुख्य स्पर्धा; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Explained: इराण अमेरिकेची नांगी ठेचणार? प्लॅन B काय? आता जगालाही हादरा बसणार! १८ कंपन्यांना धमकीमागची खरी स्टोरी काय?

पाच दिवसांत आरोपपत्र अन् १६ दिवशी थेट निकाल! सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Ready Reckoner Rates: महायुती सरकारने रेडी रेकनर स्थिर ठेवण्याचा निर्णय का घेतला? उत्तर आलं समोर...

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT