Crime Sakal
मुंबई

Dombivali Crime : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 29 वर्षीय तरुणास अटक

इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका 29 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना डोंबिवली परिसरात उघडकीस आली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका 29 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना डोंबिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काशिनाथ रमेश पाटील (वय 29) याला अटक केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

डोंबिवली पूर्व येथील पाथरी परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी राहण्यास आहे. तर काशिनाथ हा पूर्वेतीलच त्रिमूर्ती नगर झोपडपट्टीत राहण्यास आहे. सोमवारी दुपारी अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली ती पुन्हा घरी आलेच नाही.

रात्रभर तिची वाट बघितल्या नंतरही ती घरी न आल्याने तिच्या आजीने टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम. पी. मुंजाळ यांच्या पथकाने मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

परिसरातील तसेच स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मुलगी डोंबिवली स्टेशन परिसरात जाताना आढळून आली. त्यानुसार शोध घेतला असता बुधवारी रात्री मुलीचा शोध लागला. मुलीला वैद्यकीय तपासणी करता शास्त्रीनगर रुग्णालय येथे दाखल केले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे बाब पुढे आली.

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मुलीने तिच्यासोबत घडली हकीकत सांगितली. साधारण वर्षभरापूर्वी आरोपी काशिनाथ यांच्याशी तिची इंस्टाग्राम वर ओळख झाली होती या ओळखीतूनच त्याने तिला फुस लावत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.

मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी काशिनाथ याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोराटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT