Petrol Pump Sakal
मुंबई

Dombivali Crime : पेट्रोल हवे तर रांगेत या... असे म्हणताच दोन जणांनी पेट्रोल पंपावरच घातला राडा

माझ्या गाडीत पहिले पेट्रोल भर असे त्यांनी सांगितले. पेट्रोलवरील कर्मचाऱ्याने रांगेत या असे सांगताच दोघांनी पेट्रोल पंपावर राडा घालत कर्मचाऱ्यास मारहाण केली.

शर्मिला वाळुंज

माझ्या गाडीत पहिले पेट्रोल भर असे त्यांनी सांगितले. पेट्रोलवरील कर्मचाऱ्याने रांगेत या असे सांगताच दोघांनी पेट्रोल पंपावर राडा घालत कर्मचाऱ्यास मारहाण केली.

डोंबिवली - माझ्या गाडीत पहिले पेट्रोल भर असे त्यांनी सांगितले. पेट्रोलवरील कर्मचाऱ्याने रांगेत या असे सांगताच दोघांनी पेट्रोल पंपावर राडा घालत कर्मचाऱ्यास मारहाण केली आहे. बैल बाजार येथील हिंद आटोमोबाईल पेट्रोल पंपावर आज दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पेट्रोल मालक शैलेश काकराणी यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुकलीस फक्की (वय 30 ) आणि जावेद डॉन (वय 37) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिम मधील बैलबाजार येथे हिंद ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पेट्रोल पंपावर कर्मचारी सौरभ सिंग, सुरेंद्र सिंग व रमेश मिश्रा असे पेट्रोलपंप वर पेट्रोल भरण्याचे काम करत होते. दुपारी 2 च्या सुमारास एका दुचाकीवर दोघेजण पेट्रोल भरण्यासाठी आले. मात्र रांगेत दुचाकी न थांबवता पुढे येऊन त्यांनी सौरभ व रमेश यांना दमदाटी करत माझे गाडीत पेट्रोल भर असे सांगितले. सौरभ यांनी सदर व्यक्तीस तुम्ही रांगेत या मी पेट्रोल भरतो असे सांगितले. त्यानंतर दोघांनी पेट्रोलपंप वर वाद घालण्यास सुरवात केली. 'तु पेट्रोल कैसा नहीं भरता, देखता हु तुझको' असे बोलून त्यातील एकाने सौरभ याला धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने पेट्रोल भरण्याचे नोझल हातात घेवुन तो त्याच्या स्कुटीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी स्वतः घेवुन जाण्याचा प्रयत्न करू लागला.

तेव्हा एक कर्मचारी सचिन यादव यांनी त्यांच्या हातातून नोझल घेण्याचा प्रयत्न केला असता तो झटापट करू लागला. यावेळी नोझल चा चाप दाबला गेल्याने पेट्रोल उडाले. यावेळी सर्व कर्मचारी एकत्र आल्यानेदोघांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. नंतर घटनास्थळावरून दोघे निघून गेले.शैलेश यांनी दुचाकीचा फोटो काढला असल्याने ते फोटो मॅनजर सतीश सिंग यांना देऊन बाजारपेठ पोलीस ठाणे येथे पाठविले.

पेट्रोल पंप मालक शैलश यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी दुचाकीचा शोध घेत लागलीच दोघांना ताब्यात घेतले. हे दोघे कल्याण येथे राहणारे असून मुकलीस फक्की व जावेद डॉन अशी दोघांची नावे आहेत. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असून पोलिसांनी ते तपासात आपला पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT