Dombivali crime sakal media
मुंबई

डोंबिवली बलात्कार प्रकरण; कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींना करणार हजर

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवलीत (dombivali) अल्पवयीन मुलीवर (minor girl rape) 33 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील 33 आरोपींना मानपाडा पोलिसांनी (manpada police) अटक केली असून (culprit arrested) यात आणखी एक आरोपी वाढण्याची शक्यता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात विविध पुरावे पोलिसांनी गोळा केले (evidence) असून 5 गाड्या जप्त (five vehicle seized) करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर 8 महिन्यात अनेकवेळा सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी एकूण 33 जणांना अटक केली आहे. 21 आरोपींना 29 सप्टेंबरला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करून घेतली होती.

21 आरोपींची पोलीस कपथडी सोमवारी 4 ऑक्टोबर ला संपत असून त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलिसांच्या हाती सध्या आरोपींचे मोबाईल, एका आरोपीच्या घरातून जप्त केलेला हुक्का यासोबतच 2 रिक्षा, 2 वाग्नोर व 1 ज्युपिटर असे वाहन जप्त करण्यात आले आहे. न्यायलायत केस दाखल करण्यासाठी पोलिसांकडे ठोस पुरावे असून ते कोर्टात दाखल केले जातील अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

INDW vs BAN W Live: एक नंबर! २१ वर्षीय श्री चरणीने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; बांगलादेशची दैना

Mahur Crime : माहूर येथे प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीचं खून प्रकरण! 'तो' कॅब चालक निघाला नुपंसक, अत्याचार करण्यात अपयशी ठरल्याने केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT