Manpada Police Station sakal
मुंबई

Crime News : काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी चोरी! मोलकरीणच करत होती 9 महिने....

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी चोरीची घटना घडली आहे. घराच्या कपाटातील तब्बल 2 लाख 94 हजाराची रक्कम गेली चोरीला.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली मधील दावडी गावात रहात असलेले विकासक तथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. घराच्या कपाटातील तब्बल 2 लाख 94 हजाराची रक्कम चोरीला गेली असून घरात काम करणाऱ्या मोलकरणीनेच ही चोरी केली आहे. याप्रकरणी म्हात्रे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सुनीता निकम (वय 45) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली जवळील दावडी भागातील रिजेन्सी इस्टेटमध्ये काँग्रेस कार्यकर्ते अमित हे राहण्यास आहेत. अमित यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सुनीता हिला ताब्यात घेतले आहे.

याविषयी अमित म्हणाले, व्यवसातील 5 लाख रुपये मी कपाटात ठेवत असतो. 15 ऑगस्ट रोजी मला पैशांची गरज असल्याने मी पाहिले असता त्यात 2 लाख 90 हजार रुपये कमी होते. मी घरात विचारपूस केली असता घरात कोणीच पैसे काढले नसल्याचे सांगितले. त्यानंतर मी 2 सप्टेंबरला कपाटात 10 हजार रुपये ठेवले. त्यावेळी नोटांवर स्टार मार्कीग केले होते.

नंतर मी कपाट चेक केले असता 10 हजार रूपया पैकी 4 हजार कमी दिसले. म्हणुन घरातील लोकांना पैसे कोणी घेतले का याबाबत विचारणा केली असता कोणीही पैसे घेतले नसल्याचे सांगीतले. त्यांनतर आम्हाला आमचे घरी घरकाम करणारी महीला सुनीता हिच्यावर संशय आल्याने आम्ही विचारपूस केली असता तिच्याकडे स्टार मार्क केलेल्या नोटा आढळून आल्या. तेव्हा आमची खात्री झाली की, आमचे घरात घरकाम करणारी महीला सुनीता हीनेच या अगोदर देखील माझे पैसे चोरी केले आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT