Crime sakal
मुंबई

Dombivali Crime : ते तिघे रात्रीचे यायचे, मारहाण करायचे आणि....

रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करून त्यांना लुटून मुद्देमालासह दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करून त्यांना लुटून मुद्देमालासह दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. प्रेमकुमार गोस्वामी, सुरज विश्वकर्मा, नाबीर शेख या तिघांना उल्हासनगर येथून बुधवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कल्याण पूर्व भागात राहणारे भीम सिंग (वय 36) हे गेल्या महिन्यात कल्याण पूर्व भागातून मलंग गड रस्त्याने दुचाकीवरून रात्रीच्या वेळेस चालले होते. काकाच्या ढाब्याजवळ त्यांची दुचाकी आली असता तेथे तिघांनी भीम यांच्या डोक्यात काठीने जोरात फटका मारून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले. त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील पैसे, मोबाईल, स्कुटर घेऊन चोरटे पळून गेले. याप्रकरणी भीम यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अशीच घटना रविवारी शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर जवळील देशमुख होम्स भागात घडली होती. अंकलेश चौधरी (वय 35) हे रात्रीच्या वेळेत दुचाकीवरून टाटा नाका भागातून चालले होते. त्यावेळी तिघांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळील स्कुटर, पैसे लुटून नेले होते. कल्याण गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. दोन्ही घटना घडल्या तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यांना दोन्ही घटनांमधील तीन संशयित व्यक्ती सारख्याच असल्याचे आढळून आले.

आरोपींची ओळख पटवित तांत्रिक माहितिच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. आरोपी मोहने आंबिवली, उल्हासनगर भागातील रहिवासी असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांना समजले. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, संजय माळी, हवालदार गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विश्वास माने, अनुप कामत, बापूराव जाधव, प्रवीण बागुल, रमाकांत पाटील, श्रीधर हुंडेकरी, किशोर पाटील, विलास कडू, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, मिथुन राठोड, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, बोरकर यांच्या पथकाने आंबिवली, मोहने, उल्हासनगर भागात सापळा लावला. तांत्रिक माहितीच्या आधारे तिन्ही आरोपींना शिताफिने अटक केली.

अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी मलंग गड रस्ता, टाटा नाका येथे लुटमारीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींवर मानपाडा, खडकपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकी, पाच मोबाईल जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT