police fir sakal media
मुंबई

डोंबिवली : शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकास मारहाण; 15 जणांवर गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : दुचाकीला कट मारल्याचा राग आल्याने 10 ते 15 जणांनी रिक्षाचालक तसेच त्याच्या साथीदाराला बेदम मारहाण (Rikshaw driver beaten incident) केल्याची घटना डोंबिवलीत घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात (Ramnagar Police Station) 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात (Police complaint filed) आला आहे. तसेच रिक्षाचालकावर देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौक परिसरात ही मारामारीची घटना 12 डिसेंबरला घडली. रिक्षाचालक राजेश भालेराव रस्त्यावरून जात असताना स्कुटी चालक सिद्धार्थ मोरे सोबत वाद झाला. स्कुटीला कट मारल्याचा राग सिद्धार्थला आला होता. राजेश हे आपली रिक्षा घेऊन इंदिरा चौकात आले असता, अमोल केदारे, सिद्धार्थ मोरे आणि इतर 10 ते 15 लोक इंदिरा चौकात असलेल्या रिक्षा स्टँडवर आले.

या टोळक्याने रिक्षाचालक राजेशसह त्याच्या साथीदाराला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याआधारे रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रिक्षाचालकावर देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वाराला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT