crime esakal
मुंबई

Dombivali Crime : गळ्यातील सोनसाखळी चमकली आणि सुरक्षा रक्षकाची नियत फिरली

महिलेवर चाकूने हल्ला करत चोरली सोनसाखळी; खडकपाडा पोलिसांनी केली 6 तासात अटक.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - सुरक्षा रक्षकाचे काम तो करत होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेल्याने आर्थिक चणचण भासत होती. यातून बाहेर पडण्यासाठी तो विचार करत असतानाच रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चमकली आणि त्याची नियत फिरली. त्याने सोनसाखळी चोरायचा प्रयत्न केला.

महिलेने त्याला विरोध केल्याने धारदार शस्त्राने तिच्यावर वार करत त्याने पळ काढला होता. खडकपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होतात पोलिसांनी सहा तासातच आरोपी अश्विन सदाफुले याला अटक केली.

कल्याण मोहने परिसतात राहणारी प्रिया सावंत ही मंगळवारी दुपारी मुलीला शाळेतून घेऊन येत असताना, एका व्यक्तीने पाठीमागून येऊन तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचले. प्रिया हिने त्याला विरोध केला असता, धारदार शस्त्राने तिच्या मानेवर वार करत सोनसाखळी चोरून त्याने पळ कढला. प्रिया ही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात प्रिया हिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अनिल गायकवाड, शरद झिने, नंदकुमार कैचे यांनी तपास सुरू केला. अवघ्या 6 तासाच्या आत कल्याण मोहने परिसरातून अश्विन सदाफुले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार अश्विन हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र तीन महिने आधी त्याचा जॉब गेल्याने तो बेरोजगार झालेला. आर्थिक चणचनी असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. मात्र पहिल्याच चोरीत तो पकडला गेला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू

Mumbai News: मुंबईच्या वस्त्यांमध्ये वाढते मजले, कमी होते सुरक्षिततेचे भान; दुर्घटनांचा धोका कायम

Shirur Protest: अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शिरूर नगरपरिषदेसमोर लहूजी शक्ती सेनेचे बेमुदत उपोषण, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

ZP Budget Boost: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण विभागांना भरीव तरतूद

SCROLL FOR NEXT