Dombivali hotel owner staff injured sakal
मुंबई

मुंबई : डोंबिवलीत हॉटेल मालकाला 15 ते 20 जणांच्या टोळक्याची जबर मारहाण

हॉटेल मालक व कर्मचारी गंभीर जखमी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - मानपाडा रोडवरील मूकांबिका हॉटेलमध्ये 15 ते 20 जणांच्या टोळके शनिवारी मध्यरात्री घुसले. त्यांनी हॉटेलची तोडफोड करत कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून सीसीटीव्ही डीव्हीआरच्या वायर देखील तोडून टाकल्या आहेत. तसेच हॉटेलचे मालक दयांनद शेट्टी आणि एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण करत 1 लाखाची रोकड व सोन्याची अंगठी चोरुन नेली असल्याचे हॉटेल मालकाचे म्हणने आहे. याप्रकरणी रविवारी डोंबिवलीतील हॉटेल व्यावसायिक मानपाडा पोलीस ठाण्यात जमले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवर शारदा मुकांबिका हॉटेल आहे. शनिवारी मध्यरात्री एका टोळक्याने हॉटेल मध्ये घुसून धिंगाणा घातला. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, हॉटेल मधील टेबल खुर्च्यांची तोडफोड केली. डीव्हीआरच्या वायर तोडून हॉटेलचे मालक दयांनद शेट्टी आणि एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण करत त्यांच्याकडील 1 लाखाची रोकड आणि अंगठी चोरी केली असल्याचे हॉटेल मालक सांगत आहेत. या मारहाणीत हॉटेल मालक दयानंद यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच इतर मार देखील लागला असल्याने उपचारासाठी त्यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर डोंबिवलीतील हॉटेल मालक मानपाडा पोलीस स्थानकात जमले आहेत. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT