मुंबई

Dombivli News : सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचे मतदारसंघात दुर्लक्ष; फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन शिंदे मनसेत जुंपली

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - डोंबिवलीतील थोर व्यक्तिमत्वांचा अवमान करणारे फेरिवाले असा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून यामुळे फेरिवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा जोर धरु लागला आहे. फेरिवाल्यांची मुजोरी या मुद्द्यावरुन शिवसेना शिंदे गटाने मनसे आमदार पाटलांना लक्ष करत त्यांच्या आंदोलनाची जाणीव करुन दिली आहे.

तर मनसेने देखील त्यांना उत्तर देताना खासदारांचा हा मतदारसंघ असून त्यांच्यासाठी तरी तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला सहकार्य लागल्यास आम्ही करु असा टोला हाणला आहे. एकीकडे शिंदे गट व मनसेत फेरिवाला प्रश्नावरुन जुंपली असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा हा मतदार संघ असून त्यांचे मात्र आपल्या मतदार संघात दुर्लक्ष होत असल्याची चर्चा डोंबिवलीत रंगू लागली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा मतदारसंघातील डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील भिंत सुशोभित करण्यात आली आहे.

सांस्कृतिक, साहित्यिकांची नगरी असलेल्या डोंबिवलीतील थोर व्यक्तिींची ओळख समाजाला रहावी, त्यांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी डोंबिवलीकर संस्थेच्या वतीने ही भिंत सुशोभित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक व्यक्तींची माहिती, छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र सध्याच्या घडीला फेरिवाल्यांच्या सामानाच्या आड ही भिंत झाकली गेली आहे.

कपडे, बॅगा या भिंतीवर कशाही लटकवण्यात आल्या असून भिंतीचे सौंदर्य झाकले गेले आहे. हे दाखविणारा एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता थोर व्यक्तींचा अवमान करणारे हे दृष्य असून डोंबिवलीतील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे.

त्यांना कोणाचेही भय राहीलेले नाही. पालिका प्रशासन देखील कारवाई करत नसल्याने त्यांची एवढी मजल गेली असल्याची चर्चा रंगू लागली आहे.डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. किरकोळ कारणावरून या फेरिवाल्यांनी रुग्णवाहिका चालक गणेश माळी, महापालिका कर्मचारी नरेश चव्हाण यांना यापूर्वी मारहाण केलेली आहे.

स्टेशन परिसराला बकाल स्वरुप आणत दादागिरी करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मध्यंतरी मनसेने आवाज उठवित आंदोलन केले. त्यानंतर महिनाभरासाठी स्टेशन परिसराने मोकळा श्वास घेतला. मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली.

पालिका प्रशासन व मनसे थंड झाल्याने फेरिवाल्यांनी पुन्हा येथे आपले बस्तान मांडले आहे. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने कोणताही आवाज उठविण्यात आला नव्हता. आता फेरिवाल्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाने मनसेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अप्रत्यक्षरित्या भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांना देखील शिंदे गटाने लक्ष केले असल्याचे दिसते.

फेरिवाल्यांवरुन एकीकडे शिंदे गट मनसे मध्ये पुन्हा टोलवाटोलवी सुरु झाली असताना दुसरीकडे डोंबिवलीचे भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यात लक्ष घालणार का ? हे आता पहावे लागेल. असून केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती तसेच महाराष्ट्र युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी मनसेच्या आंदोलनावर सवाल उपस्थित केला आहे.

थोर व्यक्तीमत्वांचा अपमान फेरिवाले करत असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही. काही दिवसांपूर्वीच आमदारांनी याची पाहणी केली होती. त्या पाहणीतून काय साध्य झालं मला माहित नाही. परंतू या फेरीवाल्यांच्या वर्तणुकीमुळे डोंबिवलीकर व्यथित झाले आहेत. स्टेशन परिसरातील फेरिवाल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी प्रशासनाकडे करणार आहे.

दिपेश म्हात्रे, युवासेना सचिव, शिवसेना शिंदे गट

अतिशय हास्यास्पद असे हे वक्तव्य आहे. गेले 25 वर्षे यांचीच सत्ता पालिकेत असताना आता यांना फेरिवाले हटविण्याची जाग आली आहे. यामुळे हे निश्चित होते की यांचे हात पण दगडाखाली आहेत. मनसेने प्रामाणित प्रयत्न केल्यानंतर एखाद महिना का होईना डोंबिवलीकरांना या त्रासापासून मुक्ती मिळाली असेल.

म्हणून मी कायम सांगत आलो आहे की डोंबिवलीकरांनी यंदा पूर्ण सत्ता मनसेला दिली तर एकही फेरिवाला स्टेशन परिसरात बसणार नाही याची ग्वाही देतो. हे जे क्षेत्र आहे तेथे शिंदे गटाचेच खासदार आहेत, त्यामुळे हे त्यांचे देखील अपयश आहे. किमान त्या खासदारांसाठी तरी यांनी प्रयत्न केले पाहीजे. त्यांना जिथे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ.

मनोज घरत, डोंबिवली शहर अध्यक्ष मनसे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

MS Dhoni: धोनीचं श्वानप्रेम! फादर्स डे निमित्त लेकीनं शेअर केला तो खास Video; एकदा पाहाच

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

SCROLL FOR NEXT