MLA Ganpat Gaikwad sakal
मुंबई

Dombivali News : वाढदिवसाचे बॅनर काढल्याने भाजप आमदाराने केडीएमसी अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देत केला सत्कार

कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला आहे. आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठीकठिकाणी लावले होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला आहे. आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठीकठिकाणी लावले होते. केडीएमसीच्या वतीने वाढदिवस होताच हे बॅनर काढले आहेत. बॅनरवर कारवाई होताच आमदार पालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. थेट प्रभागात जात आमदारांनी पालिका अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस सोहळा पार पडला. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे फलक शहरात लावले आहेत. केडीएमसीच्या 'ड' प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील बॅनरवर कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान गायकवाड यांचे बॅनर उतरविण्यात आल्याने आमदार चांगलेच संतापले. शुक्रवारी आमदारांनी केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत गांधीगिरी पद्धतीने अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

माझे बॅनर काढले, अभिनंदन...

कायदा फक्त आमदार गणपत गायकवाड यांनाच का? असा सवाल यावेळी आमदार गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना केला. इतर बॅनर तसेच आहेत त्यावर कारवाई कधी होणार असे विचारले. माझेच बॅनर का काढले असे विचारताच अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यालयात तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे कारवाई केल्याचे उत्तर दिले. यावर फक्त माझ्याच बॅनर विषयी तक्रारी आल्या का असे देखील आमदार म्हणाले.

अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरून कारवाई

राजकीय हेतुतून तक्रारी केल्या जातात. अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरून फक्त माझ्या बॅनर वर कारवाई होते असा टोला नाव घेता आमदार गायकवाड यांनी मित्र पक्षाला लगावला. मी पण अनेक तक्रारी केल्या आहेत त्या बॅनर वर पण कारवाई करा. शहर स्वच्छतेकडे लक्ष द्या पण त्याचबरोबर पावसाळा आला आहे नालेसफाई कडे पण लक्ष द्या असे आमदारांनी यावेळी अधिकाऱ्यांना सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

SCROLL FOR NEXT