raj thackeray and mla raju patil
raj thackeray and mla raju patil sakal
मुंबई

MLA Raju Patil : ऊंची छलाँग लगाने के लिए चिता भी दो कदम पीछे आता है...

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - गुढीपाडवाच्या मुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. नरेंद्र मोदींसाठी आम्ही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी या सभेत स्पष्ट केले. त्यावर मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनीही सोशल मीडियाद्वारे 'ऊंची छलाँग लगाने के लिए चिता भी दो कदम पीछे आता है' अशा आशयाची भूमिका स्पष्ट केली आहे.

समाज माध्यमांवर आमदार राजू पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यासाठी देशातील सद्याची राजकीय परिस्थिती, विकसनशील ते विकसित भारतापर्यंतचा झालेला बदल इथपासून ते देशांतील विरोधकांची अवस्था अशा सर्व मुद्द्यांवर परखड मते मांडली. या मुद्द्यांच्या आधारे राज ठाकरे यांनी घेतलेली पाठिंब्याची भूमिका योग्यच कशी आहे यावरही आमदार राजू पाटील यांनी भाष्य केले आहे.

आमदार राजू पाटलांनी काय केली पोस्ट...

कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी wall वर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्याइतकं) सोप्पं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो.

महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थितीबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दांत सन्माननीय राजसाहेबांच्या शैलीत खरपूस समाचार घेतला गेला आहेच. परंतु आगामी निवडणुका ह्या अखंड हिंदुस्थानच्या भविष्याची वाट ठरवणाऱ्या निवडणुका आहेत.

विशेषतः आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाहीय. (आणि समजा जरी धोका पत्करायचा म्हटला तरी पर्याय कोण आहे?) ह्यांना पराभूत करून जिंकून कोणाला देणार आहोत ? आमच्या आगरी भाषेत म्हण आहे ‘खायाची मोत, पुन मिशीला तेल’ अशी मोदींच्या विरोधकांची अवस्था. ह्यांच्या नेतृत्वात आपल्या देशाचं काय भलं होणार?

शिवाय मोदींच्या कणखर निर्णयांनी देशाची प्रतिमा उजळली आहे, हे मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा स्वतः अनुभवलं आहे. खिळखिळी अर्थव्यवस्था ते पहिल्या पाचात जाऊ शकणारी अर्थव्यवस्था, 370 कलम रद्द करणे आणि माझ्या वैयक्तिक इच्छेतलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे राम मंदिराचे निर्माण, देशातील डिजिटल क्रांती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत.

सन्माननीय राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे वाईट आहे त्यावर कोरडे ओढाच, पण चांगलं आहे त्याचं कौतुक करण्याची सर्वच राजकारण्यांनी सवय घ्यायला हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची आणि अस्मितेची बाजू उंचावणारा पक्ष आहेच पण सवाल जेव्हा देशाचा येतो तेव्हा प्राथमिकता हिंदुस्थानच असणार ना.

शिवाय आम्हा सर्व मनसैनिकांच्या आवडत्या शैलीत बोट उंचावून साहेबांनी सांगितलंच आहे... विधानसभेच्या तयारीला लागा. आणि शेवटचं पण महत्वाचं सांगतो. ‘ऊंची छलाँग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT