dombivali  sakal
मुंबई

Dombivali : माऊली मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम; नवरात्री उत्सवात आरतीचा मान किन्नर समाजाला देत दिला सामाजिक संदेश

दत्तनगर मित्र मंडळ आणि माऊली मित्र मंडळ यांच्यावतीने मागील कित्येक वर्षांपासून नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - आपल्या समाजाचा घटक असलेल्या किन्नर समाजाल समाजात वावरताना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे समोर येते. मात्र यासर्व गोष्टींना छेद देत डोंबिवलीतील दत्तनगर मित्र मंडळ आणि माऊली मित्र मंडळाने नवरात्री उत्सवात किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत सामाजिक संदेश दिला आहे.

दत्तनगर मित्र मंडळ आणि माऊली मित्र मंडळ यांच्यावतीने मागील कित्येक वर्षांपासून नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे.या उत्सवा दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे कीर्तनकारना आमंत्रित करून प्रबोधनांत्मक कीर्तनाचे कार्यक्रम देखील केले जातात. तसेच यंदा किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत त्याद्वारे सामाजिक संदेश देखील या मंडळाकडून देण्यात आले आहे.

यावेळी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी बोलताना सांगितले की किन्नर समाजाच्या ज्याकाही मागण्या असतील कोणत्या अडचणी असतील त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण करू.तसेच देवीच्या आरतीचा मान दिल्याने किन्नर सायली म्हात्रे यांनी दत्त नगर मित्र मंडळ आणि माऊली मित्र मंडळ तसेच राजेश मोरे यांचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

SCROLL FOR NEXT