Dombivali RTO sakal media
मुंबई

Sakal Impact : "सुधारित दरपत्रकानुसार रिक्षाभाडे आकारा व कारवाई टाळा"

रिक्षाचालकांची भेट घेत आरटीओ अधिकारी करतात आवाहन

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : टाळेबंदीपासून (Lockdown) रिक्षाचालकांनी रिक्षाभाडे (Rikshaw fare increases) दरात वाढ केली आहे. कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागाने (Kalyan RTO) सुधारित दरपत्रक जाहीर करूनही रिक्षाचालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत आहेत. रिक्षाचालकांची मनमानी आणि प्रवाशांची होणारी पिळवणूक याविषयी दै. सकाळने (sakal news) वारंवार वृत्त प्रसारित केले आहे. तसेच सोमवारी ईसकाळने 'रिक्षाचालकांची मनमानी सुरूच, भाडे आजही 20 रु.' हे वृत्त प्रसारित केल्याने अखेर आरटीओ प्रशासन (RTO Authorities) खडबडून जागे झाले आहे. रिक्षाचालकांची भेट घेत नियमानुसार भाडे आकार आणि कारवाई टाळा असे आवाहन अधिकारी रिक्षाचालकांना करत आहेत.

कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शेअर रिक्षाभाडे निश्चितीचे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र हे दरपत्रक कागदावर असून रिक्षाचालक जादा भाडे प्रवाशांकडून आकारत आहेत. प्रवाशांनी नियमानुसार भाडे घेण्याची मागणी केली असता त्यांना कुठेही तक्रार करा अशी उद्धट उत्तरे दिली जात आहेत. याविषयी दै. सकाळने वारंवार वृत्त प्रसारित केले आहे. दरपत्रकाचे बॅनर शहरात झळकले नसल्याने रिक्षाचालक शेअर भाडे कमी करण्यास तयार नाहीत. तसेच अनेक नागरिकांनाही सुधारित दरपत्रक शहरात लागू करण्यात आल्याचे माहिती नाही.

यामुळे रिक्षाचालकांची सुरू असलेली मुजोरी आणि प्रवाशांची होणारी पिळवणूक याला वाचा फोडण्यासाठी ईसकाळने सोमवारी 'रिक्षाचालकांची मनमानी सुरूच, भाडे आजही 20 रु.' या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले. रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीमुळे आरटीओच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात होती. अखेर जाग आलेल्या आरटीओने सोमवारी सायंकाळी शहरातील स्टेशन परिसरातील रिक्षा थांब्यावर जात रिक्षाचालकांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.

रिक्षाचालकांना सुधारित दरपत्रक दाखविले जात आहे. यानुसारच भाडे आकारून आरटीओ ची कारवाई टाळावी असे आवाहन देखील अधिकारी चालकांना करत आहेत. यववेळी रिक्षाचालक त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांना सांगत आहेत. यावर तुम्ही कार्यालयात येऊन निवेदन द्या अशा सूचना त्यांना केल्या जात आहेत.

रिक्षाचालकांना सुधारित दरपत्रक दाखविले जात आहे. त्यांच्या एरिया नुसार भाडे दर दाखवून हेच दर प्रवाशांकडून घेण्याचे आवाहन त्यांना केले आहे. रिक्षाचालकांनी या नियमांचे पालन केले नाही तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती डोंबिवली उप प्रादेशिक परिवहन विभागातील मोटारवाहन निरीक्षक प्रशांत देवने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT