MLA Ganpat Gaikwad sakal
मुंबई

Dombivali News : नालेसफाई नाही, पालिकेच्या तिजोरीची सफाई; आमदार गायकवाडांची नालेसफाईवरून आगपाखड

पावसाळा तोंडावर आला असतानाही कल्याण पूर्वेतील नाल्यांची सफाई झालेली नाही.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - पावसाळा तोंडावर आला असतानाही कल्याण पूर्वेतील नाल्यांची सफाई झालेली नाही. आमदार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर तत्परतेने कारवाई करणारे पालिका प्रशासन नाले सफाई कामावर किती लक्ष देते असे म्हणत शुक्रवारी आमदारांनी अधिकाऱ्यांना पूर्वेतील विठ्ठलवाडी नाल्याची पाहणी केली. यावेळी नाल्याची सफाई पाहून ही नाले सफाई नाही पालिका तिजोरीची हात सफाई असल्याचा आरोप आमदारांनी केली.

कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. राजकीय हेतूने ही कारवाई केली गेली असे म्हणत शहर स्वच्छते सोबत नाले सफाईकडे पण लक्ष द्या असे म्हणत आमदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. विठ्ठलवाडी येथील नाले पहाणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आमदार घेऊन गेले. त्या ठिकाणी नाल्यात गाळ, कचरा तसाच असल्याने ही सफाई कधी होणार असा प्रश्न आमदारांनी विचारला. मोठ्या नाल्याची ही स्थिती तर आतील छोटे नाले कसे असतील.

नालेसफाईची कोट्यवधीची बिले काढायची आणि वाटून घ्यायची. नालेसफाई नव्हे ही पालिकेच्या तिजोरीची सफाई असा आरोप गायकवाड यांनी पालिका अधिकाऱ्यांवर केला. तसेच दोन दिवसांत ही कामे झाली पाहिजेत नाही तर माझ्या सोबत पुन्हा पाहणी करायची असा सज्जड दम देखील आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT