Poem on Potholes Sakal
मुंबई

Dombivali News : खड्ड्यांवर आता कविता देखील आली...

जागरूक नागरिकाची प्रशासन आणि कंत्राट दारावर जोरदार टिका.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली रस्त्यावरील खड्डे हा तसा गाजलेला विषय. कोणी खड्ड्यांचे चांद्रयानाने खेचलेले फोटो व्हायरल करत तर कोणी पाण्यात बोटी करून सोडत. काही नी तर खड्ड्यांवर रॅम्प सॉंग देखील बनवले. आता एका जागरूक नागरिकाने खड्ड्यांवर कविता केली आहे. या कवितेतून त्याने प्रशासन आणि कंत्राटदार यांना जोरदार टोला हाणला असून ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालीय. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. काही दिवसांपूर्वीच कल्याण मलंग रोड वर खड्डे चुकवताना एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

एकीकडे महापालिका रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा करतेय. तर दुसरीकडे ही कामे युद्ध पातळीवर नाही तर संथगतीने सुरू असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच हे खड्डे आता नागरिकांच्या जीवावर बेततायत.

दरम्यान राज्यात युतीचे सरकार आहे, मात्र कल्याण - डोंबिवली मधील रस्त्याची परिस्थिती बदलेली नाही. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे समजतं नाहीं. दरवर्षी खड्ड्यात पडून नागरिकांचा जीव जातो. तऱी गेंड्याच्या कातडीचे असलेले केडीएमसी प्रशासन सुधारताना दिसत नाही.

या सर्वाची चीड येऊन अखेर डोंबिवली एका जागरूक नागरिकाने मनसे शहरप्रमुख मनोज घरत यांना पत्र लिहले आहे.या पत्रात कविता लिहीत प्रशासन, अधिकाऱी आणि ठेकेदार यांना सणसणीत कवितेतून टोला हाणला आहे.

जागरूक नागरिकाची कविता...

खड्डे भरण्यासाठी निधी नाही कमी..

म्हणुनच ठेकेदारांकडून घेतो आम्ही..

सहा महिन्यात खड्डे पडण्याची हमी..

खड्यांमुळे भले जात असतील दहा वीस जीव..

आम्हाला मात्र त्यांची मुळीच येत नाही कीव..

त्यांच्यासाठी पिळवटत नाही आमचे आतडे..

आम्ही अंगावर पांघरते आहे गेंडयाचे कातडे..

खड्यांमुळे नागरीक झाले जरी त्रस्त..

राहतो आम्ही आमच्याच मस्तीत मस्त..

काय वाकडे कराल तुम्ही सारे पोटार्थी,..

आम्ही आहोत वेतन आयोगांचे लाभार्थी...

खड्ड्यासाठी करत राहु अतिपावसाचा बहाणा..

जोवर तुम्ही नाही हाणत पायातील वहाणा..

कधी करू आम्ही अतिवाहनांचा बहाणा..

सारेजण मस्त मिळून खाऊ हा आमचा बहाणा..

मनसे आणि पोलिसांनी रस्त्यावरचे भरावे रस्यावरचे खड्डे..

ठेकेदारांसह उबवू आमचे सायंकालीन अड्डे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT