Dombivali crime sakal media
मुंबई

डोंबिवली : दागिन्यांपायी खून, पोळी भाजी केंद्रातील महिला अटकेत

महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

शर्मिाला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवलीतील (Dombivali) 58 वर्षीय विजया बाविस्कर या महिलेची तिच्या रहात्या घरी हत्या झाल्याची (Woman murder) घटना सोमवारी उघडकीस आली होती. या हत्येप्रकरणी पोळी भाजी केंद्र विक्री चालक सिमा खोपडे (वय 40) या महिलेला पोलिसांनी अटक (culprit arrested) केली आहे. दागिण्यांच्या मोहापायी ही हत्या झाल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. मात्र हत्या करण्यामागे कोणता मुळ उद्देश होता का? महिला एकटीच होती की तिच्यासोबत अन्य कोणी साथीदार होते याचा शोध अद्याप सुरु असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली. (Dombivali police arrested a woman culprit in woman murder crime)

डोंबिवली पूर्वेतील आनंद शिला सोसायटीत राहणाऱ्या विजया बाविस्कर या महिलेची तिच्या रहात्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. घरकाम करणारी महिला घरी आल्यानंतर ही घटना समोर आली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव चुंबळे, प्रविण बाकले, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलिस उपनिरिक्षक ममता मुंजाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वणवे, पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमाळे, संदिप शिंगटे, कुलदीप मोरे आणि पोलिस अंमलदार अशी पाच वेगवेगळी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती.

woman arrested

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटिव्हीच्या आधारे आरोपी महिला सिमा हिला २४ तासाच्या आत मंगळवारी पाथर्ली येथील झोपडपट्टी परिसरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवून रहात्या घरातून अटक केली. त्यांनी विजया यांचा गळा दाबुन खून केला त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये आणखी कोणी आरोपी आहे का? मालमत्तेच्या वादातून हत्या झाली आहे किंवा अन्य कारण? याविषयी अधिक तपास पोलिस करत आहेत.

- मालमत्ता वादातून ही हत्या झाली आहे का? याविषयी पोलिस तपास करीत आहेत. विजया यांना पाच बहिणी असून त्यांनी मालमत्ता डेव्हलप करण्यास दिलेली आहे. विजया या घटस्फोटीत असून त्या एकट्याच रहात होत्या.

- मयत विजया आणि आरोपी सिमा यांची खूप जूनी ओळख आहे. विजया या घरी एकट्याच रहात असल्याची माहिती सिमा हिला होती. रविवारी दुपारी त्यांचे बोलणे झाले. त्यानंतर रात्री घरी एकट्याच असल्याने रात्री ९ ते १० च्या सुमारास झोपण्याच्या बहाण्याने सिमा घरी झोपण्यास आली होती.

- विजया यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाहून सिमा यांची नियत फिरली आणि रात्री १ ते १.३० च्या सुमारास सिमा हिने विजया यांचा गळा दाबून खून केला.

- पुरावा नष्ट करण्यासाठी विजया यांचा मोबाईल सिमा हीने टॉयलेट मध्ये फेकून दिला होता. तसेच सीसीटिव्हीमध्ये पकडले जाऊ नये म्हणून घरातून निघताना तोंड टॉवेलमध्ये झाकून, दाराला कडी लावून ती साधारण २ वाजून ५८ मिनीटांच्या आसपास घराबाहेर पडली.

- सीसीटिव्ही मध्ये पकडले जाऊ नये, किंवा कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी घरी जाताना सिमाने वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर केला. वेगवेगळे सीसीटिव्ही तपासताना पोलिसांना सदर महिलेवर संशय आल्याने त्यांनी सीसीटिव्ही रिव्हर्स मध्ये तपासले आणी सिमा त्यांच्या जाळ्यात अडकली.

- सीमा या पोळी भाजी केंद्र चालवतात, त्यांच्यावर कर्ज असून त्यांच्या केंद्रावर जप्ती देखील आलेली आहे. या तणावातून त्यांनी खून केला आहे का याचाही तपास केला जात आहे.

- सीमा यांना बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT