dombivali 
मुंबई

डोंबिवली पोलिसांना अनेक गुन्हे उलगडण्यात यश

संजीत वायंगणकर

डोंबिवली : हातातील मोबाईल हिसकावून धूम स्टाईलने चोऱ्या करणाऱ्या रेकॉर्डवरील 26 चोरांना शिताफीने अटक करण्यात डोंबिवली पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून 3 लाख 65 हजार रूपये किंमतीचे 30 मोबाईल हस्तगत करुन ते मूळ मालकांना परत केल्याने या मोबाईल धारकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करुन जणू गणपती बाप्पा पावल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे मोबाईल डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांच्या हस्ते त्यांच्या मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यात धूम स्टाईलने लूटमार करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, सौभाग्यालंकार आणि पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणारे सराईत चोरटे हाती लागत नसल्याने स्थानिक पोलिस ठाण्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला होता. मात्र अपर पोलिस आयुक्त डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी 17 जून 2017 ला डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मोबाईल चोरी विरोधी पथकांची निर्मिती केली.

पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली. त्यानुसार डोंबिवलीचे पोलिस निरीक्षक एन. एम. पाटील, फौजदार प्रशांत मोरे यांच्यासह एन. एस. अभंग, सी. आर. उदमले, सी. एस. पाठारे आणि टी. एच. लोखंडे यांनी अहोरात्र तपास करून विविध ठिकाणांहून लागोपाठ 26 सराईत चोरट्यांच्या मुसक्या बांधल्या. या चोरट्यांकडून 30 किचकट गुन्ह्यांची उकल केल्यानंतर 3 लाख 65 हजार 718 रूपये किंमतीचे 30 मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले.

विशेष म्हणजे याच पथकाने डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका किचकट गुन्ह्याची देखिल उकल केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या चोरट्याकडून 90 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला. तसेच डोंबिवली, टिळकनगर, विष्णूनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात गहाळ म्हणून दाखल असलेल्या मोबाईल च्या 62 लाख 15 हजार 500 रूपये किंमतीच्या 595 मालकांनाही हुडकून काढण्यात या पथकाला यश मिळाले आहे. गेल्या 15 महिन्यांत आतापर्यंत या पथकाने 85 लाख 81 हजार 218 रूपये किंमतीचे 625 मोबाईल, 90 हजारांचा लॅपटॉप आणि चोरट्यांकडून 50 हजारांची दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT