Dombivali congress sakal media
मुंबई

डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड; रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) पूर्वेतील पाटकर रस्त्यावरील काँग्रेस कार्यालयाची (congress office vanadalized) तोडफोड करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात (Ramnagar Police station) सोमवारी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल (police complaint filed) करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला या कार्यालयाचा वापर करता येऊ नये या उद्देशातून राजकीय पाठिंबा असलेल्या विकासकांनी कार्यालयाची तोडफोड करून त्यातील कागदपत्रे गहाळ केली असावी अशी शंका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे (Sachin pote) यांनी उपस्थित केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अन्यथा आंदोलन करु असा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.

पूर्वेतील पाटकर रोडवरील विश्वदीप सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे मध्यवर्ती कार्यालय आहे. 52 वर्षांहून अधिक जुने हे कार्यालय असून सदरची बिल्डिंगही जुनी झाली आहे. 25 ऑक्टोबर पासून कार्यालय बंद होते. रविवारी सकाळी जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष ज्ञानबा पौळकर हे कार्यालयात गेले असता त्यांना जिन्याचा काही भाग तुटलेला आढळून आला. त्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले असता आतील सामान देखील अस्ताव्यस्त करून तोडफोड केली असल्याचे दिसले.

तसेच छताचा स्लॅब देखील तुटून पडला होता. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. माहिती समजताच काँग्रेसचे प्रदेश नेते संतोष केणे, वर्षा शिखरे, नवेंदू पाठारे, अशोक कापडणे, संजय पाटील, एकनाथ म्हात्रे हे घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार रविवारी रात्री पौळकर यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली, यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, एकनाथ म्हात्रे, रवी पाटील, शरद भोइर, वर्षा शिखरे, पमेश म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना पोटे म्हणाले, 52 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे आहे. पक्षाचे कार्यालय एका रात्रीत या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. कागदपत्र चोरीला गेली आहेत, याचा अर्थ असा होतो की ही इमारत पुनर्बांधणी साठी गेल्यास काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येऊ हाच दिसतो. यामागे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होणार नाही.

स्थानिक आमदारांच्या पाठिंब्याने ही तोडफोड झाली असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी लवकरात लवकर यामागे नक्की कोण आहे हे शोधून काढावे. जागामालक वाघडकर यांनी आम्हाला असे लेखी लिहून द्यावे की या इमारतीचा पुनर्विकास झाला तर या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येईल. जोपर्यंत ही इमारत होऊ देणार नाही असा एक मताने निर्णय काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचे पोटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT