Mumbai Sakal
मुंबई

डोंबिवली : ठाकुर्ली समांतर रस्त्यावरील धक्कादायक घटना

याप्रकरणी टिळकनगर पोलीस व रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : रेल्वे (Railway) समांतर रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास रिक्षाने जाणाऱ्या दोघांना अडवून जबर मारहाण, चाकूने वार करीत एका प्रवाशाची हत्या व एकाला जखमी केल्याची घटना खंबाळपाडा परिसरात घडली. सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास ही घटना घडली असून बेचन चौहान (वय 32) असे मयत तरुणाचे नाव आहे तर बबलू चौहान (वय 35) जखमी तरुणाचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी टिळकनगर पोलीस व रेल्वे पोलीस (Police) अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात राहणारे बेचन व बबलू हे पेंटिंग, सुतार काम करतात. गावी उत्तरप्रदेशला त्यांना जायचे होते. कल्याण रेल्वे स्थानकातून दिडची गाडी असल्याने परिसरातून त्यांनी कल्याण ला जाण्यासाठी रात्री 12 च्या सुमारास रिक्षा पकडली. ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावर त्यांची रिक्षा काही अनोळखी इसमानी अडवून रिक्षा चालकाला पळवून लावले. बेचन आणि बबलू यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर रेल्वे रुळांवर त्यांना नेत तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. बबलुने तेथून पळ काढला, घर गाठत त्याने प्रथम ही माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना त्याने सांगितले. त्यांनी जखमीला सोबत घेऊन टिळकनगर पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी बबलुसोबत जाऊन घटनास्थळी गेले. तेथे बेचनचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. तसेच दोघांची बॅग व मोबाईल ही घटनास्थळी पोलिसांना आढळून आले आहेत.

चोरीच्या उद्देशाने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. घटनेतील रिक्षा चालकाचाही शोध घेतला जात आहे. बेचनची हत्या झाली की रेल्वे अपघात मृत्यू याचा तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज काही प्राप्त होत आहे का या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT