Dombivali School sakal
मुंबई

Dombivali News : गणित येत नसल्याने शिक्षिकेची विद्यार्थ्यांना मारहाण

डोंबिवली मधील शाळेत एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप मुलांच्या पालकांनी करत शुक्रवारी शाळेत घातला गोंधळ.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली मधील स. ह. जोंधळे शाळेत एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप मुलांच्या पालकांनी करत शुक्रवारी शाळेत गोंधळ घातला. गणित येत नसल्याने 5 व 6 वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षकेने मारहाण केली.

याप्रकरणी मनविसेचे कार्यकर्ते व विष्णुनगर पोलिसांनी देखील शाळेत जात प्रशासनास जाब विचारला. शाळेच्या मुख्याध्यापिका मेनन यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

डोंबिवली पश्चिमेतील स.ह.जोंधळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गणिताच्या नीलम भारमल ह्या शिक्षिकेने पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये मुलांच्या मानेला, हाताला जबर मार लागला आहे.

मुलांना मारहाण केल्याने संतप्त पालकांनी शुक्रवारी शाळेत जात गोंधळ घातला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रतिक देशपांडे, प्रीतेश महामुणकर, यतिन पाकडगावकर, मयुरेश उतेकर यांनी देखील शाळेत जाऊन विचारणा केली. शाळेच्या मुख्याध्यापिका मेनन यांच्या कार्यालयात तीन तास ठिय्या मांडत सदर शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सदर शिक्षिकेची कोणतीही कागदपत्रे शाळेत नसल्याची बाब उघडकीस आली. काही दिवसांपूर्वीच या शिक्षिकेची भरती झाली असून कोणतीही प्रक्रिया पार ना पाडता असे शिक्षक शाळेत भरती केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. शाळेतील गोंधळाची परिस्थिती पाहता विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी देखील शाळेत जाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केला.

याविषयी मनविसेचे उपशहर अध्यक्ष प्रतिक देशपांडे म्हणाले, शाळा प्रशासनाने ज्या पद्धतीने शिक्षकांची भरती करताना कोणत्याही प्रकारचे दस्तावेज न घेता भरती केलेली आहे. अशा शिक्षकांमुळे मुलांचा भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षक मिळावे यासाठी शाळा प्रशासनाने अधिकृतपणे जाहिरात देत शिक्षक पदासाठी योग्य असलेल्या शिक्षकांना भरती करावे अशी मागणी केली आहे. यावर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT