Sandesh Shirke sakal
मुंबई

Dombivali Accident : ट्रकने कट मारला, जाब विचारायला ट्रकवर चढला, ट्रकचालकाने स्टेअरिंग फिरवले आणि....

कल्याण डोंबिवली शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही वाहने बिनदिक्कत रस्त्यावर धावत असतात. या अवजड वाहनांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही वाहने बिनदिक्कत रस्त्यावर धावत असतात. या अवजड वाहनांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 27 वर्षीय तरुणाच्या दुचाकीला ट्रकने कट मारली. याचा जाब विचारायला तरुणाने ट्रकचा पाठलाग केला. ट्रकवर चढून त्याने गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. ट्रक चालकाने स्टेअरिंग हलवले आणि तो तरुण खाली पडून चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला आहे.

संदेश शिर्के असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कल्याण डोंबिवली शहरात अवजड वाहनांमुळे एकीकडे वाहतूक कोंडींची समस्या निर्माण झाली असतानाच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. कल्याण मध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. संदेश शिर्के आणि त्याचा मित्र शुभम रोकडे हे दोघे लालचौकी ते स्टेशन रोड असा दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यांची दुचाकी कल्याण स्टेशनकडे जाणा-या रोडवर ओम त्रंबकेश्वर बिल्डिंग समोर आली असता.

आयशर कंपनीच्या एका ट्रकने दुचाकीला कट मारला. याचा राग संदेशला आला. संदेशने या ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली. संदेशने ओव्हरटेक करुन ट्रक समोर गाडी थांबवली. चालकाच्या बाजूने चढुन तो चालकाला मारहाण करू लागला. यावेळी चालकाने घाबरून उजव्या बाजूला जागीच स्टेयरिंग वळवल. यावेळी संदेश पडला आणि चाकाखाली आला. या अपघातात संदेशचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बाजरपेठ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT