local sakal
मुंबई

Dombivali News : आईसोबत मुंबईला नातेवाईकांकडे जाताना मृत्यूने गाठले; 24 वर्षीय तरुणाचा ट्रेनमधून पडून मृत्यू

आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

भिवंडीत राहणारा सुनील चव्हाण हा तरुण १३ मे रोजी आईसबोत मुंबईतील नातेवाईकांकडे जात होता. कल्याणमधून दुपारी १. ३० वाजताची लोकल त्यांनी पकडली. सुनील दरवाज्याजवळ थांबला होता.

डोंबिवली- ठाकूर्ली दरम्यान खांबाची धडक बसल्याने तो ट्रेनमधून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पाच दिवस त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत उल्हासनगर येथे राहणाऱ्या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय 55) यांचा ट्रेनमधून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते. दररोज उल्हासनगरमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या पद्मन्ना शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकलमधून प्रवास करत होते.

लोकलने कल्याण स्टेशन सोडल्यानंतर संध्याकाळी 7.45 दरम्यान उल्हासनगरमध्ये उतरण्यासाठी ते लोकलच्या दरवाजात थांबलेले. मात्र त्यावेळी मागून आलेल्या रेट्यामुळे त्यांचा तोल गेल्याने विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर दरम्यान ते लोकलमधून खाली पडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पद्मन्ना यांना रेल्वे पोलिसांनी तातडीने उपचारासाठी उल्हासनगरमधील सेन्ट्रल रुग्णालयात दाखल केलं. यानंतर त्यांच्या मुलाने त्याना चांगले उपचार मिळावेत म्हणून खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला मात्र रुग्णालयात पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

तिसऱ्या घटनेत दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान स्थानिक नागरिक रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात लोकलने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री 8.45 च्या सुमारास घडली. या व्यक्तीच्या वारसांचा शोध सुरू असल्याचं पोलसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT