Dombivli Accident sakal
मुंबई

Dombivli Accident: भरधाव टेम्पोने झोमॅटो बॉयला फरफटत नेले, जागी झाला मृत्यू, सात ते आठ गाड्यांचे नुकसान

Thane Accident: याप्रकरणी मानपाडा पोलीसांनी क्लिनर आतिष जाधव याला ताब्यात घेतले.

शर्मिला वाळुंज

Zomato Accident डोंबिवली जवळील खोनी पलावा परिसरात शनिवारी रात्री टेम्पोच्या धडकेत झोमॅटो बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिकअप टेम्पो चालकाने क्लिनरला गाडी चालवायला दिली. क्लिनर टेम्पो चालवत असताना त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली.

तसेच गाडी खाली आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला काही अंतरापर्यत फरफटत नेले. या अपघातात या झोमेटो बॉय चा मृत्यू झाला आहे. सौरभ यादव असे या मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीसांनी क्लिनर आतिष जाधव याला ताब्यात घेतले.

अपघाता दरम्यान क्लिनरचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सात ते आठ दुचक्याना टेम्पोने धडक दिली. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचा क्लिनर अतिष जाधव याला ताब्यात घेतले.

जमावाची समजूत काढली. पिकप टेम्पो चालकाने हा क्लिनरला चालवायला दिल्याने हा अपघात घडला .मात्र या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले . त्यामुळे क्लीनर्र सह टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जातेय .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT