dombivali 
मुंबई

डोंबिवली -चारचाकी वाहनांना अचानक भीषण आग, जीवीतहानी नाही

संजीत वायंगणकर

डोंबिवली - डोंबिवली औद्योगिक वसाहतीजवळील भोपर रस्त्यावर असलेल्या “लोढा विहार “या गृहसंकुलातील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या तीन चारचाकी वाहनांना सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे प्रचंड धुराचे लोट उसळले.

महिलावर्गाने न डगामगता धीराने आगीचा सामना करुन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने अर्ध्या तासात कोणतीही जीवीत हानी न होता आगा विझविणे शक्य झाले. आश्चर्य म्हणजे सात मजली पाच ईमारतींच्या या संकुलात अग्निविरोधी वेगळी पाण्याची यंत्रणा (फायर हायड्रंट) नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गाड्यांचे टायर जळून धुराचे मोठे लोट सातव्या मजल्यापर्यंत पोहचले. 

वाहने संपूर्ण पेटल्याने इमारती बाहेर जमलेल्या नागरिकांनी प्रथम दहा बारा आग विरोधी सिलेंडरचा वापर करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु, हाताबाहेर चाललेल्या या आगीवर सर्व सिलेंडर संपल्यावर जवळच असलेल्या संकुलाच्यामोठ्या पाण्याच्या टाकीतून पाणी काढून बादल्यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. तेव्हा आलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन बंव अग्निशमन ददलाच्या जवानांनी थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळविले. (व्हिडीओ संजीत वायंगणकर )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT