मुंबई

Dombivli Crime: मालकाने नोकरीवरून काढल्याचा राग आल्याने तरूणाने असं काही केलं की, पडल्या हातात बेड्या

बनावट चावीने शटर उघडून त्याने चोरी केली मात्र सीसीटीव्ही मध्ये कैद

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली: डोक्यावर कर्जाचे ओझे त्यात मालकाने नोकरीवरून काढले याचा राग असल्याने त्याने शॉप मध्ये चोरी करत मालकाचा मोबाईल व 18 हजाराची रोख रक्कम चोरून नेली. चोरीचा संशय येऊ नये म्हणून बनावट चावी तयार करून घेतली.

मात्र तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आणि मालकाने त्याला ओळखतात रामनगर पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. विकास बरवटे (वय 35) असे अटक आरोपीचे नाव आहे.

डोंबिवली पूर्व येथील चार रस्ता परिसरात नथिंग बट चिकन शॉपचे दुकान आहे. 22 जून ला रात्री चोरट्याने चोरट्याने शॉपचे शटर उघडून दुकानातील 18 हजार रुपये रोख रक्कम व 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरी करून नेला होता.

दुसऱ्या दिवशी दुकान उघडलले असता दुकानात चोरी झाल्याची बाबा दुकान मालकाच्या लक्षात आली. या चोरी प्रकरणी मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दाखल तक्रारीनुसार रामनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, राठोड यांच्या पथकाने तपास सुरू केला.

शटर बनावट चवीच्या सहाय्याने उघडले गेले असून सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती तोंड बांधून जाताना पोलीस तपासात आढळून आले.

पोलिसांनी संशयित व्यक्तीची ओळख पटवली असता तक्रारदाराने सदर व्यक्ती विकास बरबटे असून पूर्वी याच शॉप मध्ये काम करत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दावडी येथून अटक केली.

पोलीस तपासात विकास याने डोक्यावर झालेल्या कर्जामुळे व त्यास नोकरीवरुन काढुन टाकल्यामुळे त्याचा बदला घेण्याकरीता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला मोबाईल व कॅश असा एकुण 25 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT