Dombivli MIDC Blast esakal
मुंबई

Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC स्फोट प्रकरणात अमूदान कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

Dombivli MIDC Blast: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका केमिकल फॅक्टरीला आग लागली. गुरुवारी बॉयलरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला असून यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sandip Kapde

Dombivli MIDC Blast:

डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ऐकू आला. आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटात काही वाहनांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र  या केमिकल कंपनीमधील रसायनामुळे दुर्गंधी पसरली आहे.

दरम्यान अमूदान कंपनीतील बॉयलर स्फोट प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमूदान कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती मेहता आणि मलय मेहताविरोधात कारवाई करण्यात आली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबाना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आगीच्या घटनेवर शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

ते म्हणाले, "डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलर स्फोटाची घटना दुःखद आहे. 8 जणांना निलंबित करण्यात आले आहे. जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking: किडनी विक्री प्रकरणातील एजंट ‘डॉ. कृष्णा’ निघाला इंजिनिअर, सोलापुरात केली अटक; बनावट नावाने पीडित शोधायचा

High BP and Pregnancy: उच्च रक्तदाब असल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती; कामा रुग्णालयातील डॉक्टरांचा अभ्यास

Jalna Crime: कारमधील मृत्यूचा उलगडा; पंचवीस लाखांची सुपारी देऊन खून, जालन्यातील प्रकरण, दोन संशयितांना पोलिस कोठडी

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ई-पीक पाहणी न झालेल्यांसाठी आता ऑफलाइन नोंद; नेमकं काय करावे लागणार?

Radio Ceylon: रसिकांना रिजवणाऱ्या ‘रेडिओ सिलोन’नेची शताब्दी; भारतासह जगभरात लोकप्रिय, ‘बिनाका गीतमाला’सह गाजले अनेक कार्यक्रम

SCROLL FOR NEXT