Dombivli MIDC Blast 
मुंबई

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली अपघातस्थळी आणखी 3 मृतदेह सापडले, एकूण मृतांचा आकडा 11 वर

Dombivli MIDC Blast accident site: डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटामधील मृतांचा आकडा वाढला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटामधील मृतांचा आकडा वाढला आहे. आज सकाळी बचावपथकाला आणखी तीन मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे एकूण मृतांची संख्या अकरा झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अद्याप घटनास्थळी शोध मोहीम सुरु आहे.

गुरुवारी अमुदान या केमिकल कंपनीत आग लागली. बॉईलरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातं. आग इतर कंपन्यांमध्ये देखील पसरली. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजुच्या रहिवाशी इमारतीच्या काचा देखील फुडल्या. तीन ते चार किलोमीटर अंतरावर स्फोटामुळे हादरा जाणवला होता. यावरुन स्फोटाची तीव्रता समजू शकेल.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अथक परिश्रमानंतर रात्री आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश आलंय. या दुर्घटनेमध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याचं काल समोर आलं होतं. पण, आज बचावपथकाला आणखी तीन मृतदेह आढळले आहेत. बचावपथकाची शोधमोहीम सुरुच असून अजून काही कामगार मलब्याखाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालत होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

SCROLL FOR NEXT