Dombivli MIDC Chemical Factory blast 
मुंबई

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील एमआयडीसी दुर्घटनेला २४ तास उलटले, तरी भावाचा शोध लागेना...; कुटुंबियांचा जीव टांगणीला

Dombivli MIDC Blast :डोंबिवली एमआयडीसीत अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटात 60 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनेला चोवीस तास उलटले आहेत. भाऊ काम करतो, त्या कंपनीत स्फोट झालाय. शहरातील रुग्णालय पालथी घालत जखमींना पहात आहोत. परंतू भावाचा शोध लागत नाही. घटनास्थळी जाऊन पहाणी केली तेथेही लवकरच माहिती समजेल असे सांगितले जात आहे. दिवस जसजसा वर जातो मनाची चिंता वाढत आहे. भावाचा कोठेच शोध लागत नाही आहे असे म्हणताच त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. विवेक कुमार राजपूत हे आपल्या मोठ्या भावाचा शोध घेत असून त्यांच्या पदरी निराशा पडत असून जीव कासावीस होत आहे.

डोंबिवली एमआयडीसीत अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटात 60 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तर 9 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. आजही अनेक कामगारांचे नातेवाईक आपल्या माणसांचा शोध घेत आहेत. रुग्णालयात जखमींमध्ये त्यांचे नाव नसल्याने घटनास्थळी जाऊन पुन्हा पुन्हा कुठे काही शोध लागतो याची चौकशी करत आहेत. काही नातेवाईक हताश झाले आहेत.

अमुदान कंपनी बरोबरच त्याच्या आजूबाजूला असलेल्या कंपन्या देखील आगीच्या कचाट्यात येऊन बेचिराख झाल्या आहेत. या कंपन्यांत काम करणारे कामगार, कर्मचारी यांचे नातेवाईक, जवळचे मित्र मंडळी त्यांचा शोध घेत तेथेच तळ ठोकून आहेत.

विवेक राजपूत हे देखील आपल्या मोठ्या भावाचा राकेश राजपूत याचा कालपासून शोध घेत आहेत. परंतू त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. राकेश हे गेल्या 10-12 वर्षापासून सप्तवर्ण कलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करत आहेत. या कंपनीत फॅब्रिक डायची निर्मिती केली जाते.

आग आटोक्यात आली आहे, शोधकार्य होऊन देखील काही तास उलटले आहेत. मात्र अजूनही राकेश यांचा कोठेच तपास लागलेला नाही. त्यामुळे राजपूत कुटूंबाची धाकधूक वाढली आहे. जसजशी वेळ पुढे सरकते तसतसे आपला माणूस सुखरुप असेल ना याची चिंता कुटूंबाला ग्रासते आहे.

राजपूत हे मुळचे उत्तराखंडचे कन्नौज गावातले आहेत. ते त्यांच्या कुटूंबासह सोनारपाडा गावात राहण्यास आहेत. राकेश काम करत असलेली कंपनी ही अमुदान कंपनीच्या समोरच असून या कंपनीला या आगीचा मोठा फटका बसला आहे. सप्तवर्ण कंपनी जळून पूर्ण बेचिराख झाली आहे. सध्या येथे कुलिंगचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाचे जवान त्यांना सांगून लवकरच तुमच्या भावाची माहिती समजेल असा दिलासा देत आहेत असे विवेक यांनी सांगताच त्यांचे डोळे पाणावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT