Dombivli MIDC Blast 
मुंबई

Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC मध्ये शाळेजवळ एका कंपनीमध्ये स्फोट; भीषण आगीत काही लोक अडकल्याची भीती

Dombivli MIDC Blast: याच महिन्यात डोंबवलीतील एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला होता.

कार्तिक पुजारी

मुंबई- डोंबिवलीमधील एमआयडीसीतील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. याच महिन्यात डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला होता. आता आणखी एका कंपनीमध्ये स्फोट झाल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्फोटाचे आवाज रहिवाशांना ऐकू आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मधील एका कंपनीत हा स्फोट झाला आहे. कंपनीमध्ये अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पाच ते सहा अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप काही स्फोटांचे आवाज येत आहे. आग आटोक्यात आलेली नाही. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

स्फोट झालेल्या कंपनीजवळच शाळा

स्फोट ज्याठिकाणी झाला त्याच ठिकाणी एक शाळा आहे. माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. केमिकल कंपनी असल्याने आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसर रिकामा करण्यात आला आहे. कंपनीच्या जवळ असलेल्या गाड्या इतर बांधकामे जळून खाक झाली आहेत.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये काही दिवसांपूर्वी एका कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर सरकारने धोकादायक कंपन्या स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय सरकारने धोकादायक कंपन्या बंद केल्या आहेत अशी माहिती दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आजूबाजूची घरे रिकामे केले जात आहेत. किती लोक नेमके आत अडकले आहेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

डोंबिवलीवर पुन्हा काळे धुराचे ढग दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. स्फोट नेमका कशामुळे लागला, शिवाय कंपनीत किती जण अडकले आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. सदर घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आगीची भीषणता लक्षात येईल.

महिन्याभरात दुसऱ्यांदा घटना

२५ मे रोजी एमआयडीसीमध्ये अंबर केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. आता एक महिन्याच्या आतच डोंबिवलीतील आणखी एका कंपनीला आग लागली आहे. कंपनीच्या बाजूलाच अभिनव नावाची शाळा आहे. अद्याप स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. आग भीषण आहे. अग्निशमन गाड्या आग विझवण्याच्या कामात गुंतल्या आहेत. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील कामगार सुदैवाने बाहेर पडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तरी कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. कंपनीमध्ये सुरुवातीला स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. आग इतर ठिकाणी देखील पसरत आहे. आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

वैशाली दरेकर यांची प्रतिक्रिया

आम्ही ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखं वाटत आहे. कधी जिवाला धोका निर्माण होईल सांगता येत नाही. यासाठी सरकार आणि कंपनीचा मालक जबाबदार आहे. एक स्फोट झाला असताना दुसरा स्फोट होणे भयानक आहे. कंपनीच्या जवळच रहिवासी राहतात. शाळा आहे. आता डोंबिवलीकरांना स्वत:च स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे. पण, आम्ही डोंबिवलीकरांसोबत आहोत, असं ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT