dombivali 
मुंबई

डोंबिवलीकरांनी अनुभवला “डिजीटल सोशल इफेक्ट”

संजीत वायंगणकर

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान केवळ जाहिरातींपुरतेच असल्याचा अनुभवा नागरिकांना पदोपदी येतच असतो. परंतु, डोंबिवली शहराचा कारभार ज्या पालिका विभागीय कार्यालयातून चालतो त्याच्या प्रांगणात सर्वत्र कचरा व भंगार सामानाचे ढीग दिवसेंदिवस वाढत होते. अनेकदा तक्रार करुन देखील येथील प्रभागक्षेत्र अधिकारी कारवाई करुन स्वच्छता करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव आल्याने सदरचे फोटो जागरुक नागरीक मिथीलेश गुप्ता यांनी थेट व्हॉट्सअॅपवर आयुक्त गोविंद बोडके यांना पाठविले व हेच का स्वच्छता अभियान? असा प्रश्न सर्व सोशल मिडीयावर केला. आयुक्तांनी तातडीने दखल घेत त्वरीत स्वच्छता करण्याचे संबंधीत अधिकारी वर्गाला फर्मावले. खडबडून जागे झालेल्या प्रशासनाकडून त्वरीत कार्यवाही होऊन सुमारे पाच ट्रक कचराव भंगार उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.

डोंबिवली विभागीय कार्यालयातील पटांगणात भंगार साचल्याने दूर्गंधी पसरली होती. पालिकेच्या ध्वज स्तंभाच्या शेजारीस कचरा आणि भंगार याचे डंपिंग झाले होते. प्रभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पालिका आयुक्त गोविंद बोडके व्हॉट्सअॅपवरील समस्यावर तत्काळ लक्ष देतात ही माहिती मिळाल्यामुळे आयुक्त बोडके यांच्या व्हॉट्सअॅप नंबर वर पालिका आवारातील भंगाराचे फोटो टाकण्यात आले.या व्हायरल फोटोकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आयुक्तांनी भंगार हटविण्याचे आदेश दिले. परिणामी विभागीय कार्यालयातील पटांगणातील कचरा व भंगार जेसेपीच्या माध्यमातून तत्काळ हटविल्यामुळे पटांगण मोकळे झाले. कचरा व भंगार काढल्यामुळे दूर्गंधीही मुक्त झाली. व्हॉट्सअॅप इफेक्टमुळे जर अशी चांगली कामे होत असतील तर आता सर्व  समस्या आयुक्तांना व्हॉट्सअॅपवर पाठवाव्यात अशी चर्चा पालिका वर्तुळात सूर होती. ‘फ’ प्रगागक्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्या देखरेखीखाली कचरा हटविण्याचे काम सूर होते. आयुक्तांनी निर्देश दिल्यामुळे स्वच्छता केल्याचेही पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT