मुंबई

मुंबईकरांनो लोकल सुरू झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; ही अधिकृत माहिती वाचा

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : सोमवारी बेस्टची सेवा सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेमार्गावर लोकल सुरू होणार असल्याची अफवा समाजमाध्यमावर पसरल्याने काही काळ मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने  उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल चालविण्याची कोणतीही तयारी नसल्याचा खुलासा केला. सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेले वेळापत्रक रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या विशेष गाड्यांचे आहे, असेही पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

23 मार्चपासून मुंबईची लोकल सेवा बंद आहे. मात्र, सोमवार (ता. ८) पासून कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बेस्टची सेवा सुरू झाल्यानंतर लोकल सुरू झाल्याचे मेसेज समाजमाध्यमावर फिरू लागले. पश्चिम रेल्वेने त्याची दखल घेऊन ती अफवा असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले, की व्हायरल होत असलेले वेळापत्रक लोकलचे नाही.

रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या  वर्कमॅन स्पेशल गाड्यांचे आहे.  त्यातून सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून आदेश येईपर्यंत लोकलची वाहतूक बंदच राहील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पश्चिम रेल्वेने  केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 1500 कोटींचा भ्रष्टाचार? पती मेल्याचे दाखवून 3 महिलांनी लाटले 6 लाख रुपये, एकाने पत्नी मेल्याचे दिले बनावट प्रमाणपत्र

Guru Purnima 2025: आज गुरुपौर्णिमा, जाणून घ्या पुजा करण्याची विधी अन् महत्व

Marathwada Rain: रिमझिम रिमझिम पावसाची; मराठवाड्यावरील रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच

आजचे राशिभविष्य - 10 जुलै 2025

मोठी बातमी! वन विभागाच्या 5 एकरात अतिक्रमण; बोरामणी विमानतळाला खोडा घालणारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा धार्मिक अतिक्रमणाकडे कानाडोळा, वनमंत्री म्हणाले...

SCROLL FOR NEXT