Raj Thackeray Sakal
मुंबई

"शिंदे समर्थकांच्या बंडांसोबत माझी तुलना नको"; राज ठाकरे असं का म्हणाले?

शिवसेनेच्या सद्य स्थितीवर एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी सडेतोड भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेले छगन भुजबळ, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तुलना केल्यानंतर "आपलं ते बंड नव्हतं", अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण हे बंड नव्हतं तर काय प्रकार होता याबाबत त्यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. (Dont compare me with proShinde revolts of ShivSena Why did Raj Thackeray say that)

राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले, पण हे पहिल्यांदाना घडलेलं नाही. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरेंचं हे बंड आणि एकनाथ शिंदे यांचं बंड यामध्ये काय फरक आहे? यावर राज ठाकरे म्हणाले, "मी बंड केलं नव्हतं. मी बाळासाहेबांना सांगून निघालो होतो. मी राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षात गेलो नाही. मी स्वतःचा पक्ष बाळासाहेबांना सांगून, भेटून मी बाहेर पडून स्थापन केला आहे. त्यामुळं यापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाशी माझी तुलना होऊ शकत नाही"

शिवसेनेच्या बंडखोर चाळीस आमदारांना स्विकारणार का?

शिवसेनेतून बंड केलेले ४० आमदार हे माझ्याबरोबर काम केलेले हे माझे जुने सहकारी आहेत. त्यामुळं त्यांच्या गटाचा मनसेत विलिनिकरणाचा मुद्दा उपस्थित झाल्यास मी त्याचा नक्की विचार करेन. पण ही तांत्रिक बाब आहे जी मला माहिती नाही. पण माझ्यासाठी सर्वात आधी महाराष्ट्र सैनिक आहे, त्यांना यासाठी मी दुजाभाव देणार नाही, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

Mumbai Crime: बॉस समजून पैसे पाठवले, पण घडलं विचित्रच; फसवणुकीतील ५.७५ कोटी रोखले, दिल्लीतून पाच जण अटकेत

IPL 2027: युवराज सिंगची IPL मध्ये नवी इनिंग! पुढील वर्षापासून 'या' भूमिकेत दिसणार?

Raigad News: महायुतीत बिघाडी! शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत फूट

Shivajirao Adhalrao Patil : आपल्या भागातून रेल्वे निघून जाण्यास विद्यमान खासदार जबाबदार

SCROLL FOR NEXT