tushar bhosale esakal
मुंबई

'या सरकारला हा शेवटचा इशारा', आचार्य तुषार भोसले संतापले

'वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल'

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: कोरोना व्हायरसच्या साथीमुळे राज्य सरकारने मागच्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारीला (wari) बंदी घातली आहे. कोरोनाचा (corona virus) फैलाव होऊ नय़े, यासाठी राज्य सरकारने (maharashtra govt) हा निर्णय घेतला आहे. पण यामुळे काही वारकऱ्यांमध्ये (warkari) अस्वस्थतता आहे. सरकाराचा हा निर्णय त्यांना मान्य नाहीय. त्यांनी पायी वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Dont Warkaris from going to pandharpur tushar bhosale)

असंख्य वारकरी पायी वारी करणार असून पोलिसांनी अनेक वारकऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सरकारला ठणकावले आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी वारकऱ्यांच्या सोबत आहे, असे तुषार भोसले यांनी सांगितले.

"राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक वारकरी आता पायी निघणार आहेत. शांत आणि संयमी वारकऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून सरकारने घाबरवू नये. आमचा या सरकारला हा शेवटचा इशारा आहे की, वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्यात या सरकारची होळी होईल" अशा शब्दात आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT