मुंबई

परवानगी नसताना ऑनलाईन वर्ग घेणाऱ्या शाळांवर तूर्तास कारवाई नको! उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय

सुनिता महामुनकर


मुंबई :  पहिली आणि दुसरीच्या वर्गांना परवानगी नसतानाही शाळांकडून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन वर्गावर तूर्तास कठोर कारवाई करु नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले. तसेच पालकांवर या वर्गांची सक्ती करु नये आणि जे विद्यार्थी गैरहजर राहतील त्यांच्यावर शाळेने कारवाई करु नये, असेही आदेश शाळा व्यवस्थापनाला दिले.  त्यामुळे आता पहिली दुसरीच्या ऑनलाईन शाळेची घंटाही तूर्तास वाजली आहे. 

युनायटेड फोरमच्या पालक शिक्षक संघटनेने केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती उज्जल भूयान आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौनफरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. राज्य सरकारने15 जून रोजी ऑनलाईन शिक्षणाबाबत निर्देश जारी केले आहेत. यानुसार दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये सहभागी केलेले नाही. या निर्णयामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत असून मागील एक महिना मुलांना शाळेचा अनुभव घेता आला नाही. सध्याच्या परिस्थितीत शाळा कधी सुरू होणार याची कल्पना नाही. त्यामुळे किमान ऑनलाईन शिक्षणतरी सुरु असावे, असा दावा पालकांनी केला आहे. तसेच, या ऑनलाईन वर्गांमध्ये मुलांवर प्रश्नाचे बंधन नसते. त्यामुळे या वर्गामुळे मुलांमध्ये तणाव निर्माण होणार नाही. उलट शिक्षण नसल्याने मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता याचिकेत वर्तवण्यात आली आहे. याचिकादारांकडून एड मिहिर देसाई आणि एड स्वराज जाधव यांनी बाजू मांडली.

अभ्यास करूनच वर्ग न घेण्याचा निर्णय
पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन वर्ग न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने शास्त्रीयरित्या अभ्यास करुनच घेतला आहे, असे सरकारी वकील भूपेश सामंत यांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती दाखल करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अवधी मागितला. न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत अवधी मंजूर केला आहे. तसेच पुढील सुनावणीपर्यंत दुसरीपर्यंत ऑनलाईन वर्ग घेणाऱ्या शाळांवर कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने तिसरी ते दहावीपर्यंत ऑनलाईन वर्गांबाबत शाळांना निर्देश जारी केले आहेत.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT