dr homi bhabha state university sakal
मुंबई

Mumbai News : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा गुरुवारी दीक्षांत सोहळा

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत सोहळा गुरुवारी, 20 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत सोहळा गुरुवारी, 20 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात होणार आहे.

या सोहळ्याला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते स्तानकांना पदवी, पदविका प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी दिली.

या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठाचे कामकाज आणि मागील काही वर्षात केलेल्या शैक्षणिक योगदान तसेच विद्यापीठाच्या प्रगती संदर्भात कुलगुरू डॉ. कामत अहवालाचे वाचन करणार आहेत.

या सोहळ्याला विद्यार्थ्याना पदवीसाठी खास वेशभूषा आणि ड्रेसकोड सांगण्यात आला आहे.तसेच विद्यापीठाच्या नियोजनानुसार विद्यार्थी, विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. युवराज मलघे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका विजया येवले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT