Jitendra Awhad  sakal media
मुंबई

Dr. Jitendra Awhad : डॉ जितेंद्र आव्हाड यांची मोदींवर टीका

त्यांना अजित दादांची काय गरज ते थेट तुमच्याकडे आले असते

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे. ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिल. त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजित दादांची काय गरज ते थेट तुमच्याकडे आले असते. अशाप्रकारचे वक्तव्य लोकांमध्ये आणि पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात उच्च नेता असे शरद पवार यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सारखा योद्धा ८४ वर्षीय ही हताश आणि निराश होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात. हे संपूर्ण भारताने पाहिले असल्याची आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. बाळासाहेबांच्या बद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणे हे अतिशय चुकीचे आहे. मी त्याचा निषेध करतो असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची नकली संतान असा उल्लेख मोदींनी केला असा प्रश्न विचारल्यावर आव्हाडांनी असे म्हणणे चुकीचं आहे. बाळासाहेबांच्या मातृत्वावर आणि पितृत्वावर शंका घेत आहेत का? बाळासाहेबांच्या बद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणे हे अतिशय चुकीचे आहे. मी त्याचा निषेध करतो. तसेच त्यांच्या मातेबद्दल संशय घेणे हे चुकीचं आहे असं होताच कामा नये. असेही आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT