dr shrikant shinde criticize uddhav thackeray shiv sena politics Sakal
मुंबई

Dr. Shrikant Shinde : ...त्यांनी धारण केलेला रंग त्यांना लखलाभ हो; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडला आहे. त्यांनी जो रंग धारण केला आहे. त्यांना त्याच्या लखलाभ हो असे उद्गार काढत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता, टीका केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडला आहे. त्यांनी जो रंग धारण केला आहे. त्यांना त्याच्या लखलाभ हो असे उद्गार काढत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता, टीका केली आहे.

होळी सणानिमित्त खासदार डॉ शिंदे यांनी कल्याण येथे रवाना होण्यापूर्वी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील टीका केली. तसेच त्यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा देत, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत रंगाची उधळण करण्यास ते विसरले नाही. याचदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी आज वेगवेगळ्या रंगात सगळेच रंगलेले असतील.

तसेच भारत एकाच रंगात रंगला आहे. तो रंग म्हणजे भगवा आपण ही आज भगव्या रंगात रंगलो आहे. पण, ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडला आणि त्यांनी जो रंग धारण केला आहे. त्यांना त्याचा लखलाभ हो. टीका करताना, त्यांनी पुढे बोलताना आम्ही भगवा रंग सोडला नाही. बाळासाहेबांचा भगवा रंग, हिंदुत्वाचा आणि प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही यावेळी खासदार डॉ शिंदे यांनी बोलताना सांगितले.

ठाण्यातून पुढे कल्याण लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांसह स्थानिक लोकांना भेटून होळीचा सण साजरा करणार आहोत असेही खासदारांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच टेंभीनाक्यावर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या सणांपैकी होळी हा एक सण आहे. तो ही आज मोठ्या आनंदात साजरा होणार आहे. तसेच तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जाणार आहेत असेही खासदारांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT