Mumbai Drainage
Mumbai Drainage Sakal
मुंबई

नालेसफाईचा वेग मंदावला! मुंबईची ‘तुंबई’ झाल्यास प्रशासन जबाबदार

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील पाऊस जेमतेम दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता याही वर्षी लवकर आणि दमदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

मुंबई - मुंबईतील (Mumbai) नालेसफाईने (Drainage Cleaning) अर्धा एप्रिल महिना संपत आला तरी वेग (Speed) घेतलेला नाही. काही ठिकाणी धीम्या गतीने नालेसफाई सुरू असून वेग वाढवण्याची गरज आहे. सध्या मुंबईतील वाढलेला उन्हाचा (Head) पारा पाहता पावसालाही (Rain) लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. असे झालेच तर मुंबईची ‘तुंबई’ होण्याची भीती माजी विरोधीपक्ष नेता रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईतील पाऊस जेमतेम दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता याही वर्षी लवकर आणि दमदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईतील नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया उशिरा राबवल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. मोठ्या नाल्यांची सफाई युद्धपातळीवर सुरू करायला हवी होती. परंतु शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईचा वेग अत्यांत धीमा आहे. त्यात यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यास मुंबईची तुंबई होण्याची शक्यता असून, याला सर्वस्वी प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार राहतील असेही राजा पुढे म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या असून त्यांचे मूल्य सुमारे ७१ कोटी रुपये आहे. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ निविदा आहेत. म्हणजेच मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

गाळ काढण्याचे उद्दिष्ट

1 नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत होते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते.

2 यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये शहर विभागात ३० हजार १४२ मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये ७३ हजार ४४३ मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ४८ हजार २५ मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे. या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे, असे पी. वेलरासू यांनी नमूद केले.

  • काही ठिकाणी धीम्या गतीने नालेसफाई सुरू असून वेग वाढवण्याची गरज

  • वाढलेला उन्हाचा पारा पाहता पावसालाही लवकरच सुरुवात होण्याची शक्यता

  • मुंबईतील नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया उशिरा राबवल्याचा आरोप

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण दोन लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे २०२२ रोजीच्या विहित मुदतीत ही कामे पूर्ण केली जातील.

- पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT