DRI Sakal
मुंबई

बॅगेत लपवून आणले 15 कोटींचे कोकेन; युगांडातील महिला अन् भारतीय प्रवाशाला मुंबईत अटक | DRIची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आपल्या बॅगेतून तब्बल १५ कोटी रूपये किंमतीचे कोकेन घेऊन जाणाऱ्या भारतीय प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. प्रवाशाच्या बॅगेत लपवलेले कोकेनही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. बॅगेत लपवलेली पावडर शोधून काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, मूळचा भारतीय असलेला प्रवासी आदिस अबाबा येथून मुंबई येथे प्रवास करत होता. त्याने आपल्या बॅगेत तब्बल 1496 ग्रॅम वजनाची पांढरी पावडर लपवली होती. ज्याची बाजारातील किंमत अंदाजे रु. 15 कोटी रुपये एवढी आहे.

त्याचबरोबर हे कोकेन घेण्यासाठी आलेल्या युगांडातील एका महिलेलासुद्धा डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. सदर महिलेला नवी मुंबईतील वाशी येथून पकडण्यात आले असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई विमानतळावर अवैधरित्या ड्रग्जची तस्करी होत असते. त्यामुळे महसूल विभागासाठी अवैध तस्करी रोखण्याचे खूप मोठे आव्हान आहे. या विमानतळावर अनेक प्रवाशांना सोन्याची तस्करी किंवा ड्रग्जची तस्करी करताना अटक करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT