Auto rikshaw 
मुंबई

Auto Rikshaw Video : दारूच्या नशेत पठ्ठ्याने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेली रिक्षा; Video होतोय Viral

रेल्वे पोलिसांनी या रिक्षाचालकावर कारवाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एका रिक्षाचालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच रिक्षा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईतील मीरा रोड स्टेशनवरील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांनी या रिक्षाचालकावर कारवाई केली आहे.

अधिक माहितीनुसार, मुंबईतील मिरा रोड स्टेशनमध्ये एक रिक्षा उभी असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या रिक्षाचालकाने दारूच्या नशेत प्लॅटफॉर्मवर रिक्षा घातल्याचा आरोप व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर या चालकाने रिक्षा कुठून कशी आणली हेसुद्धा एका प्रवाशाकडून सांगण्यात येत आहे. रिक्षाचालकाला प्रवाशांकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या चालकावर कारवाई केली आहे.

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रवाशांना जाण्यासाठी बनवलेल्या पादचारी पुलावरूनही रिक्षा घातल्याच्या घटना मुंबईत घडल्या आहेत. पण हा रिक्षाचालकाला प्लॅटफॉर्मवरून उतरता न आल्यामुळे तो अडकून पडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT