मुंबई

कोरोना व्हायचा तेव्हा होईल, पण पिण्याच्या पाण्यातील आळ्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात...

आहुती त्रिवेदी - सकाळ वृत्तसेवा

बदलापूर : बदलापूर पूर्वेतील विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्यावाटे आळ्या येत असल्याची बाब समोर आली आहे. पावसाळ्यात यापूर्वी दूषित पाण्याचा पुरवठा झाला होता. आता पाण्यावाटे आळ्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कोरोनाच्या काळात कोणताही आजार होऊ नये यासाठी नागरिक विविध प्रकारच्या खबरदारी घेत आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यात आळ्या आल्याने नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

पूर्वेतील शिरगाव, आपटेवाडी, शिंदे आळी, पाटील पाडा या भागातील 30 ते 40 हजार नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्यातून आळ्या येत असल्याचे दिसून आले आहे. या आळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही आठवड्यांपूर्वी याच भागात दूषित पाण्याचा पुरवठा झाला होता. कोरोनाच्या संकटात आधीच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असताना पिण्याच्या पाण्यात आळ्या सापडल्याने पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थानिक अभियंत्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून समस्येचे मूळ सापडत नसल्याने यावर उपाययोजना करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

पाणीटंचाईनंतर दुसरे संकट
बदलापूर पूर्व भागात काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी पाणी समस्येवरून येथे नव्याने इमारतींमध्ये घरे घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी फलकबाजी केली होती. या भागात पाणी टंचाई असून घर घेऊन पुढे मनस्ताप करून घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले होते. पाणी टंचाईच्या सावटाखाली कायम राहणाऱ्या या भागातील नागरिकांच्या घरात आता पिण्याच्या पाण्यात आळ्या आढळून आल्या आहेत.

-----------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT