मुंबई

Govrai Water News: गोराईतील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार.. पालिका हात झटकू शकत नाही!, न्यायालयाचे निर्देश

दररोज दहा टँकर पाणी पुरवण्याचे पालिकेला आदेश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: गोराईतील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची चिंता लवकरच मिटणार आहे. दररोज दहा हजार लिटर क्षमतेचे दहा टँकर पाणी गोराईतील हजारो कुटुंबियांना पुरवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हे निर्देश देतानाच पिण्याचे पाणी पुरवण्याच्या जबाबदारी पासून पालिका हात झटकू शकत नाही रहिवाशांना स्वच्छ आणि पिण्यालायक पाण्याचा पुरवठा करणे हे पालिकेचे कर्तव्य असल्याचे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.

बोरिवली पश्चिम येथील गोराई गावात रहिवाशांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडून पुरवठा केला जाणारे पाणी कमी दबावामुळे येत असून पाण्याअभावी रहिवाशांचे हाल होत आहेत. ७ हजार कुटुंबे या ठिकाणी राहत असून सुमारे २ हजार कुटुंबीयांकडे पाण्याचे नळ आहेत.

मात्र यातून पाणी येईनासे झाले आहे. या प्रकरणी गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर आज (ता.८ ) या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, संक्शन टॅंक आणि पंप बांधल्याने येथील लोकांना पाण्याची समस्या भासत आहे.

सध्या येथील रहिवाशांना ४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. संक्शन टॅंक आणि पंपाचे काम पूर्ण झाल्यावर रहिवाशांना जादा दाबाने पाणी पुरवठा होईल. खंडपीठाने हा युक्तिवाद ऐकून घेत पालिका अधिकाऱ्यांनी घरगुती वापरासाठी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे.

कोणतीही पालिका कर्तव्ये झटकू शकत नाही असे सांगत सकाळी चार, संध्याकाळी चार आणि दिवसा दोन असे १० टँकर पाणी या ठिकाणी पुरवण्याचे निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले व सुनावणी तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT