Drone esakal
मुंबई

Drone Ban : मुंबईत पोलिसांकडून ड्रोनबंदीचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर पोलिसांकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोनबंदी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर पोलिसांकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोनबंदी करण्यात आली आहे. ड्रोनबंदी संबंधी आदेश मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) विशाल ठाकूर यांनी सोमवारी जारी केला आहे.

सदर आदेश 18 ऑगस्ट रात्रीपासून 16 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत अंमलात असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायद्या अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने तसेच मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. समाज कंटक किंवा देश विघातक वृत्ती घातपात करण्यासाठी अथवा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतात यासाठी निर्णय घेतल्याचे पोलिसांनी आदेशात स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांच्या हद्दीत 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत पुढील 30 पर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादी वर बंदी असणार आहे.

या आदेशात मुंबई पोलिसांच्या हवाई निगराणीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन वगळण्यात आले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT