Aryan Shahrukh Khan sakal
मुंबई

आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ

आर्यन खान याला आज हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही.

सुरज सावंत

मुंबईतील स्पेशल एनसीबी कोर्टाने (ncb court) आज आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली. यात आर्यन खान (aryan khan) आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत ही कोठडी वाढवण्यात आली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा प्रत्यक्ष आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले नाही. ७ ऑक्टोबरला आर्यन खानला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली होती. आर्यन खान याला आज हायकोर्टाकडूनही (high court) दिलासा मिळाला नाही. त्याच्या जामिन अर्जासाठी वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र यावरची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे.

मागच्या तीन आठवड्यापासून आर्यन खान तुरुंगात आहे. आज शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यनची भेट घेतली. १५ मिनिटांसाठी ही भेट झाली. कारागृहात असताना व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्याने आई गौरी खान आणि वडील शाहरुख यांच्याशी संवाद साधला होता. मात्र आज पहिल्यांदाच शाहरुख आणि आर्यनची भेट झाली आहे.

ड्रग्ज प्रकरणात आता आर्यनच्या जामिनाचा निर्णय उच्च न्यायालयावर अवलंबून आहे. अन्य आरोपींना भेटण्यासाठी जी प्रक्रिया असते, शाहरुखलाही त्याचेच पालन करावे लागले. शाहरुख कारागृहाच्या आत आला तेव्हा त्याची एण्ट्री कारागृह रजिस्टरमध्ये करण्यात आली. आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तपासण्यात आली आणि त्यानंतर शाहरुखला टोकनसह आत पाठवण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT