अनन्या पांडे  
मुंबई

Drug case: चंकी पांडेंची मुलगी अडचणीत, अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा

ड्रग्ज प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज काल कोर्टाने फेटाळला.

सुरज सावंत

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात (drug case) बॉलिवूडमधील (bollywood) आणखी एक मोठं नाव अडचणीत आलं आहे. अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरावर आज NCB ने छापा मारला. आर्यन खानच्या Whatsapp chat मध्ये एका अभिनेत्रीच नावं आलं होत. ती अभिनेत्री अनन्याचं असण्याची शक्यता आहे. चौकशीला आज हजर राहण्यासाठी अनन्याला एनसीबीने समन्स बजावले आहे. अनन्या पांडे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. ९० च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये चंकी पांडे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती.

कालच ड्रग्ज प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर आज एनसीबीने ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या या कारवाईमुळे बॉलिवूडमधली आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनन्याची आज चौकशी झाल्यानंतर बरचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. दुपारी दोन वाजता एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यास अनन्याला सांगण्यात आलं आहे.

छापा मारल्यानंतर अनन्याच्या घरी शोध घेण्यात आला. यावेळी एक महिला अधिकारीही सोबत होती. अनन्याच्या घरी एनसीबीचं पथक धडकलं, त्याचवेळी शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही एनसीबीची टीम पोहोचली.

शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर एनसीबीची टीम का पोहोचली? ते स्पष्ट होऊ शकलेलं नाहीय. चंकी आणि भावना पांडे यांची शाहरुख-गौरी बरोबर चांगली मैत्री आहे. त्यांची मुलं आर्यन आणि अनन्या दोघेही परस्परांचे चांगले मित्र आहेत. अनन्या पांडेच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात लॅपटॉप, मोबाइलचा समावेश आहे. आर्यन खानच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचे चॅट समोर आल्यानंतर एनसीबी आज अनन्या पांडेच्या घरी पोहचली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MH-12 RTO: पुण्याचा 'MH-12' नंबर इतिहासजमा होणार? RTO चा मोठा प्लॅन तयार; नवीन वाहनांना कोणता नंबर मिळणार?

Ajinkya Rahane: अजिंक्य निवृत्तीने कोलकाता नाइट रायडर्सचा भार हलका केला; IPL 2027 साठी फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT