मुंबई

औषधविक्री गैरव्यवहाराची पाळेमुळे काश्‍मीरपर्यंत 

नेत्वा धुरी

मुंबई -  लष्करातील जवानांसाठी असलेल्या औषधांच्या विक्री गैरव्यवहाराची पाळेमुळे थेट जम्मू-काश्‍मीरपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले. पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेशातील इंदूर याबरोबरच जम्मू-काश्‍मीरमधून ही औषधे महाराष्ट्रात खुल्या बाजारात विकण्यात आल्याची माहिती असून, याप्रकरणी संरक्षण दलांच्या एका पथकातर्फे दिल्लीत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. कोट्यवधींच्या या गैरव्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरून आतापर्यंत राज्यातील 27 औषध वितरक व विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. 

भायखळा येथील "निवान फार्मास्युटिकल्स' या खासगी औषध विक्रेत्यावर गेल्या फेब्रुवारीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घातलेल्या छाप्यातून हे प्रकरण उघडकीस आले. त्यासंबंधीचे वृत्त "सकाळ'ने पाच फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते. "एफडीए'च्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईतून या विक्री गैरव्यवहारात राज्यातील काही औषधविक्रेत्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार आतापर्यंत मुंबईतील अन्य 18, पुण्यातील पाच; तसेच नाशिक आणि रायगडमधील प्रत्येकी एका औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आला. याचबरोबर "मेडलाइफ इंटरनॅशनल' या ऑनलाइन औषधपुरवठादार कंपनीच्या तळोजा येथील वितरण केंद्राचाही परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ. दराडे यांनी दिली. याप्रकरणी आणखी काही औषध विक्रेत्यांची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

खास लष्करातील जवान; तसेच नौसैनिकांसाठी असलेली ही विविध औषधे इंदूर, पंजाब आणि दिल्लीतून मुंबईत चोरट्या मार्गाने आणण्यात आल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघड झाल्याचे दराडे यांनी सांगितले. या काळ्याबाजाराचा संबंध जम्मू-काश्‍मीरशीही असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

प्रकरण काय? 
- संरक्षण दलांसाठीची औषधे मुंबईत उपलब्ध होत असल्याची खबर जानेवारी-फेब्रुवारीत "एफडीए'ला मिळाली. त्यावरून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भायखळ्यातील संकल्प टॉवरमधील "निवान फार्मास्युटिकल्स' या वितरकावर छापा. 
- या छाप्यात "सीटाग्लिप्टिन फॉस्फेट' आणि "विण्डाग्लिप्टीन' या गोळ्या जप्त. ही औषधे संरक्षण व नौदलासाठी असून, विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, हा गोळ्यांच्या पाकिटावरील शिक्का "व्हाइटनर'ने खोडण्यात आल्याचे उघडकीस. 
- "निवान फार्मास्युटीकल्स'कडून ही औषधे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात तसेच मुंबईबाहेरील अनेक भागांत विकली गेल्याचे चौकशीत उघड. त्यावरून मुलुंडमधील "सेफलाइफ एंटरप्राइजेस', सानपाड्यातील श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स आणि तळोजा व नवी मुंबईतील ऑनलाइन विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या फार्मसी कंपनीच्या गोदामांवर छापे. विविध पोलिस ठाण्यांत या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT