aryan khan instagram
मुंबई

Drugs Case: आर्यन खानची दिवाळी कारागृहातच?

आर्यनसाठी पुढील दहा दिवस महत्त्वाचे

स्वाती वेमूल

आर्यनसाठी पुढील दहा दिवस महत्त्वाचे

Aryan Khan Drugs Case: क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आता जामिन अर्ज करण्यात येईल असं त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. आर्यनच्या जामिनासाठी पुढील दहा दिवस खूप महत्त्वाचे असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील दहा दिवसांत उच्च न्यायालयाकडून त्याला जामीन मिळाला नाही तर दसऱ्यानंतर आर्यनची दिवाळीसुद्धा आर्थर रोड कारागृहात जाण्याची शक्यता आहे.

आर्यनसाठी चिंतेची बाब

येत्या ४ नोव्हेंबरपासून दिवाळी असल्याने नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात न्यायालयाच्या सुट्ट्या असतील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याआधी जर आर्यनला जामीन मिळू शकला नाही तर आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढू शकेल. ड्रग्ज प्रकरणात आर्यनसह इतर सात आरोपी गेल्या दोन आठवड्यापासून आर्थर रोड तुरुंगात आहेत. २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

विशेष न्या. व्ही व्ही पाटील यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर निकाल जाहीर केला. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. पाटील यांनी एनसीबीचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन नामंजूर केला. आर्यन प्रभावशाली कुटुंबातील आहे आणि त्याला जामीन मंजूर झाला तर तपासात बाधा येऊ शकते, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला होता. तसेच आर्यनकडे काही सापडले नसले तरी त्याला अमलीपदार्थ घ्यायचे होते आणि तो आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात होता असे गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Latest Marathi News Live Update: केरळमध्ये आमची बाजू कमकुवत असली तरीही भाजपचेच राज्य येईल - भाजप खासदार मनोज तिवारी

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT